Thursday , January 17 2019
Breaking News

अखिलेश-मायावतींची संधीसाधू आघाडी – नितीन गडकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करण्यासाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकत्र येत आहेत. ही संधीसाधू आघाडी आहे. नरेंद्र मोदी विरोधातील द्वेषाला आधार बनवून हे एकत्र येत आहेत. पंतप्रधान, भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला टक्कर देण्यासाठी ही संधीसाधू आघाडी आकाराला येत आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी विरोधकांवर निशाना साधला . दिल्लीच्या रामलीला मैदानावर भाजपाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, निष्क्रियता आणि भ्रष्टाचार ही आधीच्या सरकारची वैशिष्टये होती. पण आम्ही सत्तेवर आल्यानंतर जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मागच्या साडेचार वर्षात सुशासन, व्यवसाय सुलभता आणि विकासाभिमुख कारभार केला. राज्यसभेत व्होटबँकच्या राजकारणामुळे तिहेरी तलाकचा अध्यादेश पुन्हा आणावा लागला. राफेलवर काँग्रेसने जे आरोप केले ते फ्रान्स सरकारने फेटाळले आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली असे गडकरी म्हणाले.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

अंकितानं दिली रिलेशनशिपविषयीची कबुली!

मुंबई : ‘पवित्रा रिश्ता’ या शो मधून फेमस झालेली अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडेने प्रेक्षकांच्या मनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!