Monday , November 19 2018

अयोध्येत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर रामाची मूर्ती बनविणार;योगींची घोषणा

अयोध्या : सध्या देशभरात अयोध्येत राम मंदिराची उभारणी केंव्हा करणार अशी विचारणा सरकारला केली जात आहे. जिल्ह्याचे नाव अयोध्या केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर रामाची भव्य मूर्ती बनविणार असल्याची घोषणा केली. तसेच मंदिराच्या जागेवर मंदिरच बांधणार, मूर्तीच्या जागेसाठी पाहणी करण्यात येणार असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून अयोध्येमध्ये रामाचा 151 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची चर्चा होती. यावरून मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले. तसेच शरयू नदीच्या काठावर जागा निश्चित करण्यात आले आहे. राम मंदिराचा वाद न्यायालयात सुटेल. मात्र, मूर्ती सर्व नियमांमध्ये राहुनच उभारली जाईल. सर्व संत त्यांच्यासोबत आहेत, असेही योगी यांनी सांगितले.

दिपोत्सवावेळी शरयू नदीच्या काठावर तीन लाख दिवे लावून जागतिक विक्रम करण्यात आला. कदाचित याच जागी रामाची मूर्ती उभारण्यात येईल. राम मंदिर त्याच जागी होते याबाबत कोणतीही शंका नाही. भव्य मंदिर बांधण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल आणि नियमानुसार काम होईल, असे योगी म्हणाले. काल योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या ठेवले. तसेच विमानतळ आणि मेडिकल कॉलेज उभारण्याची घोषणा केली.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

शॉक लागून पादचारी तरुणाचा मृत्यू

भोसरी : पदपथावरील खांबाचे झाकण उघडे असल्याने त्यातून पादचारी तरुणाला शॉक बसल्याने त्याचा मृत्यू झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!