Monday , November 19 2018

अवनीचे बछडे नरभक्षक होण्याची शक्यता; युद्धपातळीवर शोध सुरु

मुंबई : १३ जणांना ठार करून नरभक्षक झालेल्या अवनी (टी-१) वाघिणीला ठार मारण्यात आले आहे. अवनीला मारल्यानंतर अनाथ झालेल्या तिच्या 11 महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सात पथके तयार केली आहेत. या बछड्यांचा युद्धस्तरावर शोध घेण्यात येत आहे. मात्र, अवनी वाघिणीचे बछडेही नरभक्षक होण्याची शक्यता शार्पशूटर शआफत अली यांनी व्यक्त केली आहे.

ज्यावेळी अवनी वाघीण माणसांची शिकार करायची त्यावेळी तिच्यासोबत तिचे बछडेही होते. त्यामुळे अवनी वाघिणीचे बछडेही नरभक्षक होण्याची शक्यता आहे. बछडे सध्या 10 ते 11 महिन्यांचे आहेत. याच वयात त्यांची शिकारीची मानसिकता घडत असते. आईकडूनच बछडे शिकार करणे शिकतात. तसेच, बछड्यांनी माणसांना खाल्ल्याचे पुरावे आहेत, असा दावाही शार्पशूटर शआफत अली यांनी केला आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून हे दोन्हीही बछडे उपाशी असल्याची शक्यता आहे. आणखी दोन-चार दिवसांत त्यांना काही खायला मिळाले नाही, तर भुकेपोटी त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. 11 महिन्यांचे बछडे हे केवळ बकरीचे लहान पिल्लू किंवा इतर दुसऱ्या लहान प्राण्याचीच शिकार करू शकतात, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

संजीवन समाधी सोहळ्यास 30 नोव्हेंबरला प्रारंभ

आळंदीत 3 डिसेंबरला कार्तिकी एकादशी आळंदी : संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा 723 वा संजीवन समाधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!