Wednesday , December 19 2018
Breaking News

अवैधरित्या मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवणाऱ्या पीएसआयला चिरडले

चंद्रपूर- अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट वाढला आहे. चंद्रपूरच्या मौशी-चौरगावजवळ अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ चालकाने गाडी अडवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर भरधाव गाडी घातली. यात गंभीर जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळाच्या सुमारास घडली. दारुबंदी असलेल्या चंद्रपूरमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. छत्रपती चिडे असे मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

स्कॉर्पिओ गाडीतून अवैध दारुची वाहतूक होत असल्याची माहिती नागभीड पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नागभीड पोलीस मौशी-चोरगावजवळ गोसी खुर्द कालव्याजवळ दबा धरून बसले होते. पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडेंसह इतर कर्मचाऱ्यांनी स्कॉर्पिओला थांबवण्याचा प्रयत्न केला. स्कॉर्पिओ न थांबल्याने पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला. त्याचवेळी तस्कराची गाडी ट्रकला धडकली. पोलीस या तस्कराला पकडायला पुढे गेले. त्याचवेळी स्कॉर्पिओ चालकाने चिडे यांच्यासह इतर पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. चिडे या अपघातात गंभीर जखमी झाले. पोलिसांनी चिडे यांना तात्काळ ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

मी पाकिस्तानी गायक असतो तर बरं झालं असतं – सोनू निगम

मुंबई : प्रेक्षकांना आपल्या आवाजानं मोहित करणार गायक सोनू निगमवर आता स्वत:ला पाकिस्तानी गायक म्हणवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!