Monday , November 19 2018

आज पुन्हा पेट्रोल स्वस्त;जाणून घ्या आजचे दर

मुंबई- पेट्रोलच्या दराने शंभरी गाठण्याचे चिन्ह होते. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीत घट होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून दररोज पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत घट होत आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर २२ पैशांनी तर डिझेलचे दर २१ पैशांनी कमी झाले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर हा ८४ रुपये ६ पैसे असेल तर डिझेलचा दर ७६ रुपये ६७ पैसे असेल.

मुंबईत असे दर असतानाच दिल्लीतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात झाली आहे. पेट्रोल दर २२ पैसे प्रति लिटर कमी झाल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर ७८ रुपये ५६ पैसे इतका झाला आहे. तर डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर २० पैशांची कपात झाल्याने दिल्लीत एक लिटर डिझेलसाठी ७३ रुपये १६ पैसे मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती घटल्याने भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात होताना दिसते आहे.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

संजीवन समाधी सोहळ्यास 30 नोव्हेंबरला प्रारंभ

आळंदीत 3 डिसेंबरला कार्तिकी एकादशी आळंदी : संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा 723 वा संजीवन समाधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!