Tuesday , October 16 2018
Breaking News

उद्यानाच्या मुरमाड जागेत बहरली रानफुले

पिंपरी चिंचवड : गेल्या चार वर्षांपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागातील एक अभ्यास गट पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आषाढ व श्रावण महिन्यात फुलणाऱ्या रानफुलांचा अभ्यास करीत आहेत.समिती पर्यावरण विभागाचे विजय मुनोत, संतोष चव्हाण, अर्चना घाळी, विभावरी इंगळे,गौरी सरोदे,विशाल शेवाळे, नितीन मांडवे, अजय घाडी,जयेंद्र मकवाना,जयप्रकाश शिंदे हे समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रानफुलांचा अभ्यास करीत आहेत.

अभ्यासाअंती काही महत्वपूर्ण बाबी निदर्शनास आल्या व नोंदण्यात आल्या त्या खालीलप्रमाणे.

१. शहरातील दुर्गाटेकडी परिसर, आकुर्डी ते चिंचवड रेल्वेरूळ टेकडीवजा परिसर, प्राधिकरणातील मुरमाड व खडकाळ मोकळ्या जागेतील काही परिसर, उद्याने,पवना व इंद्रायणी नदीकाठावरील काही मुरमाड भाग या ठिकाणी दरवर्षी च्या तुलनेत ह्या वर्षी रानफुलांमध्ये वाढ निदर्शनास आली.

२.प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यानातील मुरमाड मातीमध्ये तब्बल चार वर्षाच्या खंडानंतरअभ्यासकांना पिवळी चटकदार गवतप्रजातीमधील पिवळी फुले,तेरडा,कोरांटी,कंकर,तगर,गोकर्ण,वडेलिया,दगडी पिवळी फुले फुललेली आढळली.

 

 

३.किटकप्रणालीची नैसर्गिक अन्नसाखळी भक्कम होण्यासाठी रानफुलांची महत्वाची भूमिका असते.फुलपाखरू तसेच मधमाश्यांनसाठी रानफुले ही अन्नसाखळीस पर्वणीच ठरते.

४ परागिकरणासाठी सदरची रानफुले मोठी भूमिका बजावत असतात.ह्या वर्षी पावसाच्या सरी समाधानकारक कोसळल्यामुळे रानफुले मुरमाड जागेतसुद्धा बहरली असल्याचे दिसून येत आहेत.

 

 

५. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये फिरावयास आलेल्या नागरिकांचे सदरची रंगीबेरंगी रानफुले लक्ष वेधून घेत आहेत.
या बाबत पर्यावरण अभ्यासक विजय मुनोत म्हणाले,”पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या पर्यावरण विभागाने रानफुलांच्या वाढीसाठी व संवर्धनासाठी विशेष मोहीम दरवर्षी राबविली पाहिजे.व त्याचप्रमाणे उद्यानांमध्ये रानफुले संवर्धन होण्याकरिता उपाययोजना राबविल्या पाहिजेत.”

समिती पर्यावरण समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,”प्राधिकरणातील भौगोलिक परिस्थिती, तसेच मुरमाड भूभाग हा रानफुलांसाठी पोषक आहे.तसेच सुनियोजित उद्यानांमुळे रानफुलानां मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाली आहे.पालिकेने योग्य नियोजन केल्यास भविष्यात रानफुलांच्या प्रजातींमध्ये नक्कीच वाढ होऊ शकते.”

About Mahadev Gore

हे देखील वाचा

पश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार

कोलकाता- पश्चिम बंगालमधील हुगळी येथे प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात कोसळून ६ ठार तर २० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!