Friday , September 21 2018
Breaking News

‘ऑनलाईन’द्वारे सव्वा लाखांचा गंडा

वाकड : महिलेच्या नावावर तिच्या परस्पर दिल्ली मधील एका बँकेत खाते उघडून तिच्या मूळ खात्यातून रक्कम ऑनलाईन पद्धतीने वळवून घेण्यात आली. हा प्रकार 29 ऑगस्ट 2018 रोजी घडला. अर्चना इंदरलाल जैसवाल (वय 41, रा. धनराज पार्क, वाकड. मूळ रा. गौतम नगर, नवी दिल्ली) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना वाकड आणि परिसरात फ्रीलान्स कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करतात. यांचे ऍक्सिस बँकेमध्ये मूळ खाते आहे. अज्ञात इसमाने त्यांच्या नावाने बाराखंबा रोड, नवी दिल्ली मधील आय डी एस सी बँकेत खाते उघडले. त्या खात्यावर अर्चना यांच्या ऍक्सिस बँकेच्या खात्यातून 95 हजार 400 रुपये वळवून घेतले. तसेच 27 हजार रुपये ई पेमेंट सर्व्हिसेस पेमेंट गेट वे द्वारे काढले. एकूण 1 लाख 22 हजार 400 रुपये काढून घेण्यात आले असून हा सर्व प्रकार अर्चना यांच्या परस्पर झाला आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रमेश केगार तपास करीत आहेत.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

निपाणे येथील एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

निपाणे- एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील माधवराव राजाराम पाटील (वय 42) यांचा गुरुवारी दुपारी 3.30 वाजता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!