Friday , December 14 2018
Breaking News

कोणाच्याही निवडणूक प्रचारात भाग घेणार नाही – फेसबुक

सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये प्रचारात सक्रिय सहभाग घेणाऱ्या फेसबुकने यापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०१६ मध्ये निवडणूक प्रचारासाठी त्यांच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले होते. मात्र आता कोणाच्याही निवडणूक प्रचारात भाग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात येणार नसल्याचं फेसबुकने स्पष्ट केलं आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी फेसबुकसह इतर ऑनलाइन कंपन्या गुगल आणि ट्विटरने मोफत सहकार्य करण्याचं ठरवलं होतं. अमेरिकेच्या निवडणुकीतील सहभाग आणि अॅनालिटिका प्रकरण यामुळे फेसबुकवर टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर फेसबुकने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगतरित्या ऑनलाइन पोर्टलच्याद्वारे जागतिकस्तरावर उमेदवारांना सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करू, असं फेसबुकनं म्हटलं आहे. तसेच राजकीय संघटना आजही फेसबुकचा वापर करून मूलभूत प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा जाहिरात मंजूर करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून मदत घेऊ शकतात, असंही फेसबुकने स्पष्ट केलं आहे.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

भाजपाच्या दोन गटातील सत्ताधार्‍यांमध्ये रंगला ‘कलगीतुरा’

वरणगाव पालिकेत सत्ताधार्‍यांचा अनधिकृत कामांचा सपाटा -नितीन माळी ; जनहितासाठी हजारो गुन्हे दाखल झाले तरी पर्वा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!