Wednesday , December 12 2018
Breaking News

गव्हर्नरपेक्षा अर्थमंत्रीपद मोठे; २०१४ मधील डॉ.मनमोहनसिंग यांचे वक्तव्य चर्चेत

नवी दिल्ली : आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांमधील वाद सध्या देशभरातील चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्री वादावरून माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी २०१४ मध्ये केलेल्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. २०१४ मध्ये डॉ.मनमोहन सिंग यांनी त्याच्या मुलीने लिहिलेल्या पुस्तकात म्हटले होते, की अर्थमंत्रीपद हे आरबीआय गव्हर्नरपेक्षा वरचे असते. मनमोहन सिंग हे आरबीआय गव्हर्नरही होते. हा गव्हर्नर सरकारला तेव्हाच नडू शकतो, जेव्हा त्याने नोकरी सोडण्याचे ठरविले असले पाहिजे, असे या पुस्तकात म्हटले आहे. हे पुस्तक 2014 मध्ये प्रकाशित झाले होते.

आरबीआयमधील काम केलेल्या दिवसांची आठवण सांगताना सिंग यांनी गव्हर्नरला कोणताही निर्णय घेताना आधी सरकारची मंजुरी घ्यावी लागते. अर्थमंत्र्यांचे पद मोठे असल्याने गव्हर्नरला त्यांच्या सूचना टाळता येत नाहीत. जर त्याला नोकरी सोडायची असेल तरच तो मंत्र्यांशी वाद घालू शकतो, असे म्हटले आहे.

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सिंग हे गव्हर्नर होते. त्यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मी त्यांना आरबीआयची भुमिका स्पष्ट केली आणि इच्छा नसेल तर निर्णय फेटाळण्यासही सांगितले होते. ती एक सरकारी योजना होती. सरकारने आरबीआयला आदेश देऊन हा वाद संपवला, अशीही आठवण त्यांनी या पुस्तकामध्ये दिली आहे. दमन सिंग यांनी स्ट्रिक्टली पर्सनल: मनमोहन गुरुशरण हे पुस्तक लिहिले आहे.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेला मोठा प्रतिसाद

पुरुष गटात पुण्याचा विश्‍वास गायकवाड, तर महिला गटात इंग्लंडची अलेक्सांड्रा मूर विजेती पुणे : वेस्टर्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!