Wednesday , November 21 2018
Breaking News

गौतम गंभीरचे हे रूप अचंबित करणारे

नवी दिल्ली- परस्पर संमतीने दोन समलैंगिकांनी ठेवलेले संबंध म्हणजे गुन्हा नसल्याचे महत्वपूर्ण आणि ऐतिहासी निर्णय मागील आठवड्यात सुप्रीम कोर्टाने दिला. कलम ३७७ विषयीचा हा निर्णय ऐतिहासिक ठरला असून त्याचं सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

आता या निर्णयाला क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही पाठींबा दिला आहे. विविध विषयांवर आपल्या ठाम भूमिका मांडणाऱ्या गौतमने तृतीयपंथीयांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून डोक्यावर पदर घेऊन, कपाळावर टिकली लावून महिलांचा वेश धारण करत सर्वांनाच थक्क केले.

नवी दिल्ली येथे पार पडलेल्या हिजडा हब्बाच्या सातव्या पर्वाच्या अनावरणाच्या वेळी त्याने हजेरी लावली होती. त्याचवेळी त्याचं हे रुप पाहायला मिळालं. एचआयव्ही एड्स एलायन्स इंडियातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये ‘बॉर्न धीस वे’ अशी थीमही ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमात गंभीरने घेतलेली ही भूमिका आणि तृतीयपंथीयांच्या समर्थनार्थ त्याचं हे पाऊल सध्या सोशल मीडियावर अनेकांचच लक्ष वेधत असून त्याचीच सर्वाधिक चर्चा होत आहे.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

राजे रघुनाथराव देशमुख वाचनालयात स्व.इंदिरा गांधी व संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

रावेर- कार्तिक एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीला संत नामदेवांची जयंती व भारताच्या पूर्व पंतप्रधान स्व. इंदिराजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!