Tuesday , August 21 2018
Breaking News

जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली – स्टीव वॉ

नवी दिल्ली : जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली हाच सध्या आहे असे ऑस्ट्रलिया संघाचा माजी कर्णधार आणि फलंदाज स्टीव वॉ याने म्हटले आहे. इतकेच नाही तर त्याने याबदल स्पष्टीकरण सुध्दा दिले आहे.

माजी खेळाडू आणि क्रिकेट समीक्षक यांची जगात क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज कोण या मुद्दयावर मते वेगवेगळी आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सर्वोत्तम आहे असे काहीजण म्हणतात तर काहीजण इंग्लंडचा जो रूट, ऑस्ट्रलियाचा खेळाडू स्टीव स्मिथ हा दावेदार आहे अशी मत मांडतात. पण ऑस्ट्रलिया संघाचा माजी कर्णधार स्टीव वॉ याने मात्र विराट कोहली हाच सर्वोत्तम फलंदाज आहे असे म्हटले आहे.

स्टीव वॉ ने विराटच सर्वोत्तम फलंदाज का याचे कारण देताना म्हटले आहे की, विराट कडे असे तंत्र आहे की, त्याच्यामुळे तो कसल्याही परिस्थितीमध्ये उत्तम फलंदाजी करू शकतो आणि त्याने ते त्याच्या खेळातून सिध्द देखील केले आहे. सध्या विराटसारखे फलंदाजीचे तंत्र जगातील दुसऱ्या कोणत्याच फलंदाजाकडे नाही.

काही दिवसापूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली हा नंबर 1 चा फलंदाज झाला आहे. त्याने ऑस्ट्रलियाच्या स्टीव स्मिथला मागे टाकत हा क्रमांक प्राप्त केला आहे.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा

मुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.