Thursday , January 17 2019
Breaking News

जम्मू – काश्मीरमधील स्फोटात पुण्यातील मेजर शहीद

श्रीनगर : जम्मू – काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात पुण्यातील मेजर शशीधरन नायर शहीद झाले आहेत. मेजर नायर हे पुण्यातील खडकवासला येथे राहत होते.

राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात रूपमती आणि पुख्खरणी या ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळ पेरुन ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या दोन स्फोटांमध्ये सैन्यातील मेजर शशीधरन नायर हे शहीद झाले आहे. त्यांच्यासोबत एक जवानही शहीद झाला आहे. नियंत्रण रेषेजवळ गस्त घालणाऱ्या सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यासाठीच दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला.

शहीद झालेले मेजर शशीधरन नायर हे पुण्यातील रहिवासी होते. त्यांची पत्नी तृप्ती नायर या पुण्यातील खडकवासला येथे राहतात. मेजर शशीधरन हे ३३ वर्षांचे होते. ११ वर्षांपासून ते सैन्यात कार्यरत होते.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

आयुष्मानची पत्नी ताहीरावराने पुन्हा सोशल मीडियावर शेअर केली एक भावनिक पोस्ट

मुंबई : आयुष्मान खुरानाच्या पत्नीला कन्सर झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. काही दिवसांपूर्वी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!