Wednesday , December 12 2018
Breaking News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे नाव आता ‘दिल्ली कॅपिटल्स’!

नवी दिल्लीः इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सातत्याने निराशाजनक कामगिरी करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने नावात बदल करण्याचा निर्णय घेतला होता.दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने आणि मालकांनी हा निर्णय घेतला असून आज दिल्ली कॅपिटल्स असे नामकरण करण्यात आले आहे.

दिल्ली संघाने २०१९ च्या हंगामासाठी भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनला घेतले आहे. धवनला आपल्या चमूत घेत दिल्लीने मोठे यश मिळवले आहे. ११ वर्षांनंतर धवनचे दिल्ली संघात पुनरागमन होणार आहे. दिल्लीने १५ खेळाडूंना कायम राखले असून ते अजून १३ खेलाडू घेऊ शकतात. त्यांच्याकडे २५.५ कोटी रुपये आहेत. त्यामुळे २०१९ च्या हंगामात दिल्ली मजबूत संघ मैदानात उतरवण्यासाठी सज्ज आहे.

यूबीए बास्केटबॉल लीगमधून दिल्ली संघाला कल्पना आली आहे. या लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स नावाचा संघ आहे. त्यात अमेरिकेत वॉशिंग्टन कॅपिटल्स नावाचा आईस हॉकी संघ आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने नवीन भागीदार जेएसडब्ल्यू यांनी काही बदल सुचवले आहेत. २०१८ च्या हंगामात दिल्ली संघाला अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि तेव्हापासूनच संघाचे नाव बदलण्याचा विचार सुरू आहे. २०१८ च्या हंगामाच्या सुरुवातीला संघाची धुरा गौतम गंभीरच्या खांद्यावर सोपवली होती. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सला दोन जेतेपद जिंकून देणारा गंभीर दिल्लीसाठी लकी ठरला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीची सुरुवातही निराशाजनक झाली. त्यानंतर त्याने कर्णधारपद सोडले आणि संघाची धुरा युवा खेळाडू श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेला मोठा प्रतिसाद

पुरुष गटात पुण्याचा विश्‍वास गायकवाड, तर महिला गटात इंग्लंडची अलेक्सांड्रा मूर विजेती पुणे : वेस्टर्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!