Wednesday , December 12 2018
Breaking News

दीपवीरने पोस्ट केले आणखी काही खास क्षणचित्रे

मुंबई : गेल्या आठवड्यात दीपिका आणि रणवीर सिंगचे विवाहसोहळा पार पडला. इटलीतल्या लेक कोमो या नयनरम्य परिसरातील एका व्हिलामध्ये राजेशाही थाटात हा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नातल्या फोटोंची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. सुरवातीला दोघानींही विधीचे फोटो गुपित ठेवले होते मात्र आता लग्नानंतर दोघेही सोशल मीडियावर मेहंदी, लग्नाचे विधीतळे काही फोटो पोस्ट करत आहेत.

लग्नाच्या फोटोंसाठी चाहत्यांनी फार प्रतीक्षा केली होती. कारण १५ तारखेला संध्याकाळी या दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता इन्स्टाग्रामवर दोघांनीही बरेच फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिकाच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह सहज पाहायला मिळत आहे.

रणवीरने दीपिकाच्या मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत तर दीपिकाने रणवीरच्या मेहंदीचे. रणवीर आणि दीपिका आज सकाळीच मुंबईहून बंगळुरूला रवाना झाले आहेत. बंगळुरुमध्ये दीप-वीरने मित्रपरिवारासाठी स्वागतसमारंभाचं आयोजन केलं आहे. या रिसेप्शनची तयारी सुरू झाली आहे.

About Shajiya Shaikh

हे देखील वाचा

वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेला मोठा प्रतिसाद

पुरुष गटात पुण्याचा विश्‍वास गायकवाड, तर महिला गटात इंग्लंडची अलेक्सांड्रा मूर विजेती पुणे : वेस्टर्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!