Friday , September 21 2018
Breaking News

दुचाकी धडकेत महिला जखमी

सांगवी : रस्त्यावर बोलत उभ्या असलेल्या महिलेला भरधाव वेगात जाणा-या दुचाकीने धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शितोळे नगर, जुनी सांगवी येथे घडली. प्रतिभा देवानंद भोळे (वय 32, रा. मदने चाळ, फडतरे वॉशिंग सेंटर जवळ, शितोळे नगर, जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्नपूर्णा बाळासाहेब गोडसे (वय 55, रा. शितोळे नगर, जुनी सांगवी) असे जखमी महिलेचे नाव आहे.
शितोळेनगरातील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी अन्नपूर्णा त्यांच्या मैत्रिणींसोबत सांगवी चौपाटीकडून मुख्य रस्त्याच्या बाजूला फडतरे वॉशिंग सेंटर जवळ रस्त्यावर गप्पा मारत उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी एक अ‍ॅक्टिवा (एम एच 14 / जी जी 1620) भरधाव वेगात आली आणि अन्नपूर्णा यांना धडक दिली. यामध्ये अन्नपूर्णा यांच्या डोक्याला मागच्या बाजूला तसेच दोन्ही डोळ्यांच्या भूवयांवर गंभीर जखम झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

निपाणे येथील एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

निपाणे- एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील माधवराव राजाराम पाटील (वय 42) यांचा गुरुवारी दुपारी 3.30 वाजता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!