Wednesday , December 12 2018
Breaking News

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण: १२ आरोपींविरोधात ६ हजार पानांचे आरोपपत्र

मुंबई – नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने आज विशेष सत्र न्यायालयात १२ आरोपींविरोधात ६ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी अटक आरोपींविरुद्ध पुरावा प्राप्त झाल्याने आणि बेकायदेशीर कृत्य तरतुदीनुसार राज्य शासन तसेच बेकायदा शस्त्र कायद्याच्या तरतुदीनुसार पालघर आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडून आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी घेऊन आरोपी शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, अविनाश पवार , लीलाधर लोधी, वासुदेव सूर्यवंशी, सुजीथ कुमार, भारत कुरणे, अमोल काळे, अमित बड्डी, गणेश मिस्कीन यांच्याविरोधात स्फोटक पदार्थांचा कायदा १९०८च्या कलम ४,५ सह स्फोटकांचा कायदा १८८४ च्या कलम ९ – ब, बेकायदेशीररीत्या कृत्ये (प्रतिबंध) कायदा १९६७ च्या कलम १६, १८, १८ – अ, १८-ब, १९, २०, २३, भा. दं. वि. कलम २१२, ११५, ४६८, ४७१, ३७९, २०१, बेकायदा शस्त्र कायदा १९५९ कलम ३, ५, ७, २५, २७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार आरोपपत्र एनआयए कायद्यान्वये स्थापित विशेष सत्र न्यायधीश यांच्या न्यायालयात आज सादर करण्यात आले.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेला मोठा प्रतिसाद

पुरुष गटात पुण्याचा विश्‍वास गायकवाड, तर महिला गटात इंग्लंडची अलेक्सांड्रा मूर विजेती पुणे : वेस्टर्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!