Thursday , January 17 2019
Breaking News

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवकच्या कार्याध्यक्षपदी योगेश गवळी 

पिंपरी चिंचवड : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विशेषत: युवकांची संघटना बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी स्वतः लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे निष्ठावान उद्योजक पंडीत गवळी यांचा मुलगा योगेश गवळी यांना पिंपरी चिंचवड शहर युवकच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. बुधवारी दि. 9 रोजी पुणे येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडच्या आजी-माजी नगरसेवकांची आढावा बैठक घेण्यात आली.  निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी पक्षाचे जीव तोडून काम करणारे युवक कार्यकर्ते एकत्र करण्याची जबाबदारी युवकांची आहे. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे, वैशाली काळभोर, नाना काटे, पंडीत गवळी, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विशाल वाकडकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संजय वाबळे आदि सर्व विद्यमान नगरसेवक, नगरसेविका यावेळी उपस्थित होते. निवडीनंतर योगेश गवळी म्हणाले की, शहराचा विकास हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झाला आहे. विकास साधण्याची धमक केवळ राष्ट्रवादीमध्ये आहे. पक्षाच्या हितासाठी नाराजी बाजूला ठेवून एकदिलाने काम करण्याचा युवकांचा प्रयत्न राहील. तसेच युवकांचे संघटबन मजबुत करण्यासाठी शहर राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातुन प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.

About Shajiya Shaikh

हे देखील वाचा

अमित शहा यांच्या प्रकृतीत सुधारणा; एक-दोन दिवसात मिळणार डिस्चार्ज-भाजप

नवी दिल्ली-भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!