Sunday , January 20 2019
Breaking News

पुण्यात भर दुपारी कोयत्याचा धाक दाखवून ५ लाख लुटले

पुणे : पुण्यातील गंगाधाम चौक ते मार्केटयार्ड दरम्यानच्या बुधाणी कॉलनी जवळच्या गल्लीत दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलपंपावरील जमा झालेली रोकड बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीला दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग जबरदस्तीने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. मार्केटयार्डात गर्दी असताना हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गंगाधाम चौकात पेट्रोल पंप आहे. या पेट्रोलपंपावरील रोकड बँकेत जमा करण्याचे काम शेख महंमद हुसेन हे करत असतात़. नेहमीप्रमाणे आज सकाळी ते पेट्रोल पंपावर आले. त्यांनी पेट्रोल पंपावर जमा झालेली ४ लाख ७५ हजार रुपये एका बँगेत भरले व ते पावणे बाराच्या सुमारास मार्केटयार्ड येथील स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी दुचाकीवरुन निघाले दुचाकीला त्यांनी पुढे पैशाची बॅग लावली होती. गंगाधाम चौकातून मार्केटयार्डला येताना ते कडेच्या बुधाणी कॉलनीतील गल्लीतून जात असताना अचानक काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांनी मोटारसायकल त्यांना आडवी घातली. त्यामुळे त्यांना थांबायला लागले. तेव्हा एकाने त्यांच्या गळ्याला कोयता लावला, दुसऱ्याने दुचाकीच्या हँडलला असलेली पैशाची बॅग जबरदस्तीने काढून घेतली आणि तिथून ते पसार झाले.

दिवाळीनिमित्त मार्केटयार्डमध्ये सध्या गर्दी असते. असे असताना चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करुन ते आडबाजूच्या रस्त्यावर गेल्यावर डाव साधल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या रस्त्यावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

तुमच्याकडे दुसरं काम नाही का? – स्वरा भास्कर

मुंबई : स्वरा भास्करने क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांची पाठराखण केली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!