Tuesday , August 21 2018
Breaking News

पोलीस हवालदाराची आत्महत्या

पुणे : पोलीस हवालदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. उमेश राऊत डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. उमेश राऊत (45) स्वारगेट पोलीस लाइन बिल्डिंग क्रमांक सहामध्ये वास्तव्य करत होते.

डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये उमेश राऊत हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे कोर्टाची ड्युटी असायची. बुधवारीदेखील ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्यानंतर रात्री घरी आल्यावर त्यांच्यात आणि पत्नीमध्ये भांडण झाले. त्यांची पत्नी भांडण झाल्यावर घराबाहेर जाऊन बसली होती. त्यावेळी उमेश बाथरूममध्ये गेले. बराच वेळ ते बाहेर न आल्याने आवाज देण्यात आला. मात्र काहीच प्रतिसाद न आल्याने अखेड दरवाजा तोडण्यात आला. यावेळी उमेश यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल नेले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्वारगेट पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा

मुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.