Monday , November 19 2018

प्रियांका आणि निकच्या लग्नात एकाही बॉलिवूड कलाकाराला आमंत्रण नाही?

मुंबई : देशी गर्ल प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. ‘देसी गर्ल’च्या लग्नाकडे संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष लागले आहे. पण माहितीनुसार, प्रियांका तिच्या लग्नात कोणत्याच बॉलिवूड कलाकाराला आमंत्रित करणार नाहीये.

याआधी प्रियांकाच्या लग्नात सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, फरहान अख्तर, सिद्धार्थ राय कपूर हे उपस्थित राहणार अशा चर्चा होत्या. मात्र, आता या लग्नात केवळ प्रियांका व निकचे अतिशय जवळचे नातेवाईक व मित्र यांचाच सहभाग असेल.

३० नोव्हेंबरला प्रियांकाचा संगीतसोहळा आहे. या संगीत सोहळ्यात निक आणि प्रियांका दोघेही परफॉर्म करणार आहे. ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत जोधपूरमध्ये त्यांच्या ग्रॅन्ड विवाह सोहळा पार पडणार आहे.

About Shajiya Shaikh

हे देखील वाचा

संजीवन समाधी सोहळ्यास 30 नोव्हेंबरला प्रारंभ

आळंदीत 3 डिसेंबरला कार्तिकी एकादशी आळंदी : संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा 723 वा संजीवन समाधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!