Sunday , January 20 2019
Breaking News

फक्त भोसरीतील विकासकांना नोटीस का?

विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांची चौकशीची मागणी; आयुक्तांवर आर्थिक हितसंबंधाचा घेतला संशय

पिंपरी चिंचवड : भोसरीतील विकसकांना महापालिकेच्या बांधकाम विभागाने नोटीस बजाविल्याने यात कोणाचे तरी हितसंबंध गुंतल्याचा दाट संशय आहे. पिंपरी- चिंचवडमधील विकसकांना वगळून तसेच निवडणूका डोळ्यासमोर ठेवून विकसकांची कोंडी करुन त्यांच्याकडून वसुली करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी केला आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.

त्यात म्हटले आहे की, बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकाधारकांशी केलेल्या करारनाम्यातील नमूद तरतूदी,अटी व शर्तीचे पालन करावे. पालन न केल्यास महापालिकेमार्फत गृहप्रकल्पास देण्यात आलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात येईल, अशा प्रकारच्या नोटीस महापालिकेने भोसरी विधानसभा मतदार संघातील विकसकांना दिल्या आहेत.याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी काही सवाल उपस्थित करुन महापालिका आयुक्तांना जाब विचारला आहे. यामध्ये भोसरी मतदार संघातील किती विकसकांना नोटीस दिल्या आहेत. त्यांची नाव, पत्ते व नोटीसची प्रत देण्यात यावी, एकदा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्यानंतर तो कायद्यानुसार नंतर रद्द करता येतो का ?, ज्या विकसकांना नोटीस दिल्या आहेत त्यांच्याबाबत सदनिकाधारकांनी महापालिकेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत काय ?, केवळ भोसरीमध्येच नविन गृहप्रकल्प चालू आहेत काय ? शहरातील अन्य भागातही गृहविकास प्रकल्प चालू आहेत त्यांना नोटीस का दिलेल्या नाहीत त्यांची कारणे देण्यात यावीत ?, पूर्णत्वाचा दाखला सदर गृहप्रकल्प महापालिकेने मंजुर केलेल्या आराखड्यानुसार बनविला आहे किंवा नाही याची खातरजमा करुन दिला जातो, मग बांधकाम पूर्णत्वाचा दाखला गृहप्रकल्पाची पाहणी न करताच दिला जातो का ? अशा प्रकारे जाब विचारला आहे.

राजकीय दबावापोटी कारवाई…

भोसरी विधानसभा मतदार संघातील विकसकांना नोटीस दिल्याने त्यात कोणाचे तरी आर्थिक हितसंबध गुंतले नाहीत ना ? असा दाट संशय व्यक्त केला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून एकतर्फी निर्णय घेऊन आपण सुध्दा या आर्थिक हितसंबधांमध्ये आयुक्तांना आपण देखील सहभागी आहात, असाही दाट संशय व्यक्त केला. तसेच आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून विकसकांची कोंडी करुन त्यांच्या कडून वसुली सुरु करण्यासाठी ही राजकीय दबावापोटी कारवाई असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही साने यांनी केली आहे.

About Shajiya Shaikh

हे देखील वाचा

तुमच्याकडे दुसरं काम नाही का? – स्वरा भास्कर

मुंबई : स्वरा भास्करने क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांची पाठराखण केली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!