Tuesday , August 21 2018
Breaking News

फरार आरोपींना रेल्वे स्थानकावरच ठोकल्या बेड्या

राज्याबाहेर पलायन करण्याच्या होते तयारीत

पिंपरी-चिंचवड  :गंभीर गुन्हे करणारे तीन आरोपी शहरातून दुसर्‍या राज्यात पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्या रेल्वे स्थानकावरच मुसक्या आवळल्या. त्यातील एका आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून तो मागील एक वर्षांपासून फरार होता. ही कारवाई चिंचवड पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकावर केली. विकी उर्फ विकास अंकुश भिसे (रा. दळवी नगर), पितम आवतारे (रा. थेरगाव), राजू उर्फ राजकुमार हिरवे (रा. दळवी नगर, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.

जाणार होते उत्तरप्रदेशला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपी पुणे रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेशला पळून जात असल्याची माहिती चिंचवड तपास पथकाचे पोलीस नाईक विजयकुमार आखाडे यांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने पुणे रेल्वे स्थानकावर सापळा लावून विकी, प्रीतम आणि राजू या तिघांना ताब्यात घेतले.

पाच दिवसांची कोठडी

विकी भिसे याच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगार कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर तो चिंचवड पोलीस ठाण्यात आणखी दोन गंभीर गुन्ह्यात मागील एक वर्षापासून फरार होता. त्याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात 8, निगडी पोलीस ठाण्यात दोन आणि पिंपरी पोलीस ठाण्यात एक असे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. पितम आवतारे याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात तीन आणि वाकड पोलीस ठाण्यात दोन असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. राजु हिरवे याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात दंगा आणि मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तिनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यांनी केली कामगिरी

ही कामगिरी तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग जगताप, पोलीस नाईक राजेंद्र शिरसाठ, विजयकुमार आखाडे, सचिन वरणेकर, पंकज भदाने,पोलीस शिपाई डोके यांच्या पथकाने केली आहे.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा

मुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.