Tuesday , October 16 2018
Breaking News

बाळूमामाच्या नावानं चांगभलं!

१३ ऑगस्टपासून कलर्स वाहिनीवर

मुंबई : लोकपरोपकारार्थ आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेल्या “श्री सदगुरु संत बाळूमामा” यांचे चरित्र आणि त्यांच्यातील दैवत्वाची प्रचिती लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कलर्स मराठी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे साक्षात महादेवाचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या “संत बाळूमामा” यांचे जीवन चरित्र. बालमूर्तीच्या मंगल चरित्राचा आरंभ – “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” १३ ऑगस्टपासून सोम ते शनि संध्या. ७.३० वा. कलर्स मराठीवर ही मालिका प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे

संतोष अयाचित लिखित या मालिकेची निर्मिती साजरी क्रिएटीव्हज यांनी केली आहे. या मालिकेच्या निमित्ताने व्यवसाय प्रमुख कलर्स मराठी, कलर्स गुजराती आणि वायकॉम 18 मोशन पिक्चर्स प्रादेशिक चित्रपट निखिल साने म्हणाले, “कलर्स मराठीद्वारे आम्ही नेहमीच नवनव्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करत असतो, यावेळेस आम्ही संत बाळूमामांची गोष्ट प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहोत. महाराष्ट्रमध्ये अनेक थोर संत होऊन गेले ज्यांनी समाजामध्ये जनजागृतीचे कार्य केले. परंतु बाळूमामांचे वैशिष्ट्य हे की, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागांमध्ये फिरून सगळ्या स्थरांमधील लोकांना एकत्र करून त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. या मालिकेद्वारे प्रेक्षकांना संत बाळूमामांचा जीवनप्रवास आणि महात्म्य बघायला मिळणार आहे. तसेच त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचा आमचा हेतू आहे

About Mahadev Gore

हे देखील वाचा

पश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार

कोलकाता- पश्चिम बंगालमधील हुगळी येथे प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात कोसळून ६ ठार तर २० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!