Sunday , September 23 2018
Breaking News

बेकरीला आग लागून छताचा स्लॅब कोसळला भट्टीवर

ठाणे । राबोडीतील पाव बेकरीला शनिवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली. यातच छताचा स्लॅब हा भट्टीवर कोसळला. पण, सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले. त्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा नि: श्‍वास सोडला. ठाण्याच्या राबोडी परिसरातील अहमद चाळीमध्ये शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. येथे फाहिम शहा यांच्या मालकीची वन प्लस वन पाव बनविण्याची बेकारी आहे. बेकारीच्या खालच्या भागात पावाची भट्टी लावण्यात येते आणि पावाची निर्मिती करण्यात येते. तर वरच्या मजल्याचा वापर बेकरीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना राहण्यासाठी केला जातो.

ईदच्या निमित्ताने बेकरी बंद असल्याने काम करणार्‍या कर्मचार्‍यांना सुट्टी होती. सर्व कामगार आपल्या वरच्या मजल्याच्या घरात होते. शनिवारी दुपारी अचानक शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण, भट्टीवर सुकण्यासाठी ठेवलेल्या पावामुळे आगीने पेट घेतल्याचेही शक्यता वर्तविण्यात येत आहे. धूर वरच्या मजल्यावर आल्यानंतर कर्मचारी घराबाहेर पडले. काही क्षणानंतर वरचा स्लॅब खाली बेकरीच्या भट्टीवर पडला. सुदैवाने सर्व कामगार धूर आल्यानंतर बाहेर पडले होते. अन्यथा, जीवितहानी झाली असती.

या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथक व अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहचून तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा नि: श्‍वास सोडला. मात्र, या घटनेमुळे रहिवासी भागांमध्ये सुरू असलेल्या बेकरी आणि भट्टयांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

About admin

हे देखील वाचा

डीजे आणि डॉल्बीच्या आवाजावरची बंदी कायम – उच्च न्यायालय

मुंबई : महाराष्ट्रात गणेशोत्सव मिरवणुकीच्या काळात डॉल्बी आणि डीजेचा आवाज बंदच राहणार आहे. मुंबई उच्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!