Monday , July 23 2018

बेकायदा पाणी उचलल्याने 46 शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल

पुणे । बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर, को-हाळे बुद्रुक गावच्या हद्दीतील नीरा डाव्या कालव्यातून बेकायदा पाणी उचलल्याने 46 शेतकर्‍यांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत महेश अशोक साळुंके (वय 30, कालवा निरीक्षक वडगाव पाटबंधारे शाखा) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 17 मार्च ते 15 जूनच्यादरम्यान नीरा डाव्या कालव्यामधील वितरिका क्रमांक 6 ब ते 16 फाट्यामध्ये प्रवाहित नीरा डाव्या कालव्यामध्ये या शेतकर्‍यांनी अनधिकृतपणे व बेकायदेशीर प्रवाहित नीरा डाव्या कालव्यामधील पाण्यात सायफन टाकले. त्याद्वारे नीरा डाव्या कालव्यातील पाणी त्यांच्या शेतातील विहिरीत, तळ्यात, डबक्यात नेऊन तेथून पुढे शेतीला देत असल्याचे वारंवार कृत्य करीत असताना आढळून आले होते.

वेळोवेळी तोंडी समज दिली होती
पाटबंधारे विभागाने वेळोवेळी तोंडी समज या शेतकर्‍यांना दिली होती. तरीदेखील त्यांनी त्याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने त्यांच्या सायफनचे पंचनामे केले. यावेळी कालव्याच्या भरावाचे नुकसान केल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांच्याविरुद्ध सरकारतर्फे महाराष्ट्र सिंचन कायद्याप्रमाणे तक्रार दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. बिरू ठोंबरे, बबन कचरे, तात्याबा माळशिकारे, प्रदीप गायकवाड, महादेव पडळकर, राहुल नाझीरकर, उमाजी खोमणे, शंकर शिरवाळे, वसंत जाधव, अनिल शिंदे, शाम खोमणे, प्रशांत पवार, मारुती माळशिकारे, पांडुरंग ऊर्फ मनोहर पोमणे, बजाबा भगत, मनोहर वाबळे, वसंत जाधव, अरविंद माळशिकारे, संजय माळशिकारे, गणपत जाधव, मारुती भगत, नानासोा ढोपरे, बाळासोा साळुंके, इसाक शेख, बबन ढोपरे, दिलीप साबळे, आनंदराव गाडे, विजय वायसे, संपत नलवडे, प्रभाकर आडागळे (सर्व रा. कोजहाळे बु॥, ता. बारामती, जि. पुणे) शिवाजी पडळकर, अनिल वाबळे, संजय जायपत्रे, महादेव वाबळे, सुरेश वाबळे, बिपीन वाबळे, गणपत खंडेराव वाबळे, बाळासोा वाबळे, पोपट वाबळे, सचिन वाबळे, मारुती वाबळे, आबासोा वाबळे, संपत वाबळे, शिवाजी ठोंबरे (सर्व रा. मुढाळे, ता. बारामती), श्रीरंग साळवे, मनोज साळवे (दोघेही रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हे देखील वाचा

पुर्नवसनासह अनेक मागण्या मान्य करण्यासाठी शासनाकडून उदासिनता

पिंपरी-चिंचवडला पाणी नाही देणार प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचा ठाम विरोध टाकवे बुद्रुक : पिंपरी-चिंचवड महानगराची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!