Thursday , January 17 2019
Breaking News

भोसरीकर लवकरच भरविणार इंद्रायणीथडी

बचतगटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी 
भोसरी : महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भरविण्यात येणारी यंदाची पवनाथडी जत्रा भोसरीत भरविण्यात येणार होती. परंतु, ऐनवेळी ठरावामध्ये बदल करत सांगवीत जत्रा घेण्यात आली. त्यापार्श्‍वभूमीवर भोसरीकर आता पवनाथडीच्या धर्तीवर लवकरच इंद्रायणीथडी जत्रा भरविणार आहेत. याबाबतचे फलक सोशलमिडीयावर ‘व्हायरल’ झाले असून जत्रेवरुन सत्ताधार्‍यांमध्ये कुरबुरी सुरु झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुजा महेश लांडगे यांच्यावतीने जत्रेचे आयोजन
पुण्यातील भीमथडी जत्रेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुमारे बारा वर्षांपूर्वी पासून पवनाथडी जत्रा भरविण्यास सुरुवात केली. महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेतर्फे महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. पंरतु, पवनाथडी जत्रा भरविण्याच्या ठिकाणीवरुन तत्कालीन सत्ताधार्‍यांमध्ये नेहमीच मतभेद होत होते. विद्यमान सत्ताधार्‍यांमध्ये देखील जत्रेच्या ठिकाणावरुन मतभेत झाले होते.
यंदाची पवनाथडी जत्रा भोसरीत भरविण्यात येणार होती. परंतु, ऐनवेळी ठरावामध्ये बदल करत सांगवीत जत्रा घेण्यात आली. त्यापार्श्‍वभूमीवर भोसरीकर आता पवनाथडीच्या धर्तीवर लवकरच इंद्रायणीथडी जत्रा भरविणार आहेत. याबाबतचे फलक सोशलमिडीवर व्हायरल झाले आहेत. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पुजा महेश लांडगे यांच्यावतीने जत्रेचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. सन्मान स्त्री शक्तीच्या जिद्दीचा, गौरव नारीशक्तीच्या कर्तृत्वाचा, ‘खेळ महोत्सव खास महिलांसाठी अशा मजकुराचे फलक झळकले आहेत.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

अंकितानं दिली रिलेशनशिपविषयीची कबुली!

मुंबई : ‘पवित्रा रिश्ता’ या शो मधून फेमस झालेली अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडेने प्रेक्षकांच्या मनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!