Thursday , January 17 2019
Breaking News

माथेफिरुंकडून शहरात 18 दिवसात 7 दुचाकींची राखरांगोळी

हनुमान नगरमध्ये पुन्हा माथेफिरुंकडून दुचाकी बर्निंगचा थरार 

सीसीटीव्हीत कैद असतानाही आरोपींना अटक का नाही? 

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना आर्थिक नुकसानाची झळ

जळगाव-  शहरात हुनमान नगरात अज्ञात माथेफिरुंनी घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी जाळून टाकल्याची घटना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान विशेष म्हणजे पोलीस गस्तीच्या वेळेतच शहरात गेल्या 18 दिवसांमध्ये विविध ठिकाणी माथेफिरुंकडून एकूण 7 दुचाकी जाळण्यात आल्या असून पोलीस प्रशासनाकडून कारवाई न करता झोपेचे सोंग घेण्यात आल्याचे चित्र आहे. एकीकडे गाड्यांचे इश्‍नुरन्स नसल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असताना दुसरीकडे दुचाकी जाळणारे संशयित सीसीटीव्हीत कैद असतानाही पोलीस आरोपींना अटक करत नसल्याने आता पोलिसांवरच संशय निर्माण झाला आहे.

शहरातील रामेश्‍वर कॉलनी परिसरात संजय रंगराव रंगारी हे पत्नी, मुलासह अशा कुटूंबासह वास्तव्यास आहेत. त्याचे मागच्या बाजूने घर असून समोरील रस्त्याच्या बाजूने प्रभा नावाचे किराणा दुकान आहे. घराच्या समोरील गेटमध्ये गुरुवारी रंगारी यांनी नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी अ‍ॅक्टिवा (क्र. एम.एच 19 ए.आर.6902) लावली होती. रात्री 12 ते 1 वाजेदरम्यान कुणीतरी अज्ञात माथेफिरुने त्यांची दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. रस्त्याने ये-जा करणार्‍या कंपनी कामगारांकडून रंगारी या उठवित दुचाकी जळत असल्याबाबत माहिती दिली. त्यांनी पत्नीसह दुचाकीवर पाणी मारले व दुचाकी विझविली. वेळीच प्रकार लक्षात आल्याने दुचाकी वाचली. अन्यथा दुचाकीची राखरांगोळी झाली असती.

भाडेकरुन मुलीच्या दुचाकीची राखरांगोळी
संजय रंगारी यांनी त्याचे घरातील काही खोल्या ह्या भाडेकरारावर दिल्या आहे. त्यात बँकेत नोकरी करणार्‍या मूळ शिवाजीनगर येथील पूजा कोळी ह्या बहिणीसह राहतात. पूजा हिनेही तिची दुचाकी (एम.एच 19 6894) गेटमध्ये लावली होती. यादरम्यान रंगारी यांच्या दुचाकीसह माथेफिरुंनी पूजा हिची दुचाकी जाळली. प्रकार लक्षात आला तोपर्यत कोळी हिच्या दुचाकीची राखरांगोळी झालेली होती. दोन वर्षापूर्वीच दुचाकी घेतली होती. तिलाही जाळल्याने पूजा हिला अश्रू अनावर झाले होते. दरम्यान गेट बंद असताना माथेफिरुने गेट उघडून दुचाकी पेटविल्या. दोघांच्या गाड्याचे इन्शुरन्सची मुदत संपले असल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.

दुचाकी जाळणारे जोमात अन् पोलीस कोमात
शहरात शिवाजीनगर येथे 24 डिसेंबर रोजी सलीम मजीद खान व त्यांचे भाऊ जहाँगिर या दोघा भावांच्या घरासमोर लावलेल्या दुचाकी जाळल्या होत्या. याचदिवशी ईश्‍वर राजपूत व त्यांचा मुलगा विक्की राजपूत या पिता-पूत्रांच्या दोन्ही घरासमोर लावलेल्या दुचाकींची राखरांगोळी झाली होती. 8 जानेवारी रोजी पिंप्राळा परिसरातील संत मिराबाई नगर मध्ये जगदीश कुळकर्णी या पूजार्‍याची घरासमोर लावलेली 37 हजार रुपये किमतीची दुचाकी जाळली होती. दरम्यान या घटनांप्रकरणी कांचनगर, शहर तसेच रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. विशेष म्हणजे कांचननगरातील घटनांमध्ये दुचाकी जाळताना तीन तरुण सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र पोलिसांकडून कुठलीही कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे पोलीस गस्तीच्या वेळेतच या घटना घडत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत असून ‘दुचाकी जाळणारे जोमात’ व ‘पोलीस कोमात‘ असे चित्र पहावयास मिळत आहे.

About Kishor Patil

हे देखील वाचा

चाळीसगावचे डॉ.तुषार राठोड यांना बंजारा हिरा पुरस्कार

चाळीसगाव- बंजारा समाजातील तरुण पिढीला सामाजिक उपक्रम राबवून विविध संदेश देणार्‍या येथील स्टार फाऊंडेशनचे अध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!