Tuesday , October 16 2018
Breaking News

मुंबई – आग्रा महामार्गावर अपघात ; एक जण ठार

जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक

धुळे : मुंबई -आग्रा महामार्गावरील आर्वी गावाजवळ सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्रकने दोघांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.या अपघाता नंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्गावर रास्तारोको केला.या दरम्यान तेथून जाणाऱ्या जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली.

मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे तालुक्यातील आर्वी गावाजवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर उभे असलेले दोन ग्रामस्थांना ट्रकने चिरडले . ही अपघाताची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. यात एक जण जागीच ठार झाला तर एकास गंभीर दुखापत झाली. यामुळे आर्वी ग्रामस्थांनी एकत्र आले. परिणामी महामार्गावरील दोनही बाजुंची वाहतूक ठप्प झाली होती. त्याचवेळेस जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे नाशिक येथील बैठकीसाठी जात होते. जिल्हाधिकाऱ्यांचे एमएच १८ एजे ७२७१ या क्रमांकाचे वाहन बघताच वाहनावर कोणीतरी दगड भिरकाविला त्यात वाहनाचा काच फुटल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी समयसुचकता पाहून वाहन थांबविले आणि घटना काय घडली आहे, ग्रामस्थांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

अपघातातील मयत आणि जखमींना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.गंभीर असलेल्या रुग्णावर उपचार सुरु आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याची माहिती मिळताच तातडीने पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत शांतता राखण्याचे आवाहन केले.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

पश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार

कोलकाता- पश्चिम बंगालमधील हुगळी येथे प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात कोसळून ६ ठार तर २० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!