Thursday , January 17 2019
Breaking News

मॅरेथॉननंतरच्या अल्पोपहाराने धावपटूंना मिळाली ‘इन्स्टंट एनर्जी’

भुसावळ- भुसावळ शहरात दुसर्‍या झालेल्या भव्य अशा मॅरेथॉन स्पर्धेने शहरवासीयांमध्ये रविवारची पहाट चैतन्य निर्माण करून गेली. आयोजकांनी स्पर्धकांची बडदास्त राखली असतानाच सर्व सहभागी धावपटूंसाठी भुसावळातील प्रसिद्ध अशा अष्टभूजा डेअरीचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे व त्यांच्या पत्नी व नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांच्यातर्फे उपम्यासह केळीचे वाटप करण्यात आले. तीन, पाच व दहा किलोमीटर अंतर धावून आलेल्या धावपटूंना या अल्पोपहाराने ‘इन्स्टंट एनर्जी’ मिळाली व त्यांनी आयोजकांसह दात्यांना ‘क्या बात है’ म्हणून दादही दिली. या शिवाय कार्यक्रमास प्रमुख म्हणून उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनाही केळी, अंडी, टरबूज, ब्रेडसह चहा, कॉफी, उपमा नास्ता स्वरूपात देण्यात आला. शहरात यापूर्वी स्पर्धा झाल्या असल्यातरी एकाचवेळी एक हजार स्पर्धकांसह त्यांच्या जोडीला शहरातील लहान-थोरांसह शेकडो वयोवृद्धांनी देखील धावत त्यांचा उत्साह वाढवला आयोजक असलेल्या पोलिस दलालाही शहरवासीयांनी धन्यवाद दिले.

About गणेश वाघ

हे देखील वाचा

अमित शहा यांच्या प्रकृतीत सुधारणा; एक-दोन दिवसात मिळणार डिस्चार्ज-भाजप

नवी दिल्ली-भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!