Thursday , January 17 2019
Breaking News

मेक्सिको सीमेवर भिंत बांधणारच-डोनाल्ड ट्रम्प

न्युयोर्क-मेक्सिको सीमेवर कोट्यावधी डॉलर्स खर्च करून भिंत बांधण्याच्या प्रस्तावावर आपण ठाम असून त्यासाठी अमेरिकी सरकार ‘शट डाऊन’मुळे वर्षभर बंद राहिले तरी आपण मागे हटणार नाही, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचा भिंतीसाठी विधेयकातील तरतुदीपेक्षा जास्तच निधी देण्यास विरोध असून त्यामुळे सरकारच्या आर्थिक तरतुदी रोखण्यात आल्या असून टाळेबंदीचा दोन आठवडे सुरू असलेला वाद अद्याप सुरु आहे.

सीमेवरील सुरक्षा महत्त्वाची असून आज ना उद्या लोकांना याचा विचार करावा लागणार आहे. आम्हाला जे करणे गरजेचे आहे ते आम्ही करूच असे ते म्हणाले. अनेकांना वेतनाविना काम करावे लागत असून अनेक जण बिनपगारी रजेवर आहेत तरी या संघराज्य कर्मचाऱ्यांचा अमेरिकी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा आहे असा दावा करून ते म्हणाले की, या लोकांना सध्या कामाचे पैसे मिळत नाहीत पण त्यातील अनेक जण आमच्या भूमिकेचे समर्थक आहेत, असे ते म्हणाले. प्रतिनिधिगृहात आता डेमोक्रॅटिक पक्षाचे संख्याबळ वाढले असून टाळेबंदीवर कोणताही तोडगा सध्या दृष्टिपथात नाही. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प कुठल्याही सवलती देण्यास तयार नाहीत.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

आयुष्मानची पत्नी ताहीरावराने पुन्हा सोशल मीडियावर शेअर केली एक भावनिक पोस्ट

मुंबई : आयुष्मान खुरानाच्या पत्नीला कन्सर झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. काही दिवसांपूर्वी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!