Monday , November 19 2018

मेहुल चोक्सीचा सहकारी दीपक कुलकर्णीला कोलकत्याहून अटक

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने देशाबाहेर पलायन केले आहे. दरम्यान ईडी (अंमलबजावणी संचलनालय)ने मेहुल चोक्सीचा सहकारी दीपक कुलकर्णीला अटक केली आहे. कोलकाता विमातळावरून दीपक कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे. हाँगकाँगहून दीपक कुलकर्णी परतला होता तो कोलकाता विमानतळावर येताच त्याला ईडीने अटक केली.

अन्वये दीपक कुलकर्णीला अटक करण्यात आली. आज मंगळवारी त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दीपक कुलकर्णीची ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला मुंबईला आणण्यात येईल कारण यासंदर्भातली तक्रार मुंबईत दाखल करण्यात आली आहे. मेहुल चोक्सीच्या विविध व्यवसायांशी दीपक कुलकर्णी संबंधित आहे. तसेच कर्ज बुडवेगिरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातल्या मुख्य आरोपींपैकी तो एक आहे असेही ईडीने म्हटले आहे.

दीपक कुलकर्णी हाँगकाँग मध्ये असलेल्या एका डमी फर्मचा संचालक आहे. ही फर्म मेहुल चोक्सीशी संबंधित आहे असेही समजते आहे. त्याच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंटही जारी करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. आता त्याच्या चौकशीतून काय काय सत्य बाहेर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

संजीवन समाधी सोहळ्यास 30 नोव्हेंबरला प्रारंभ

आळंदीत 3 डिसेंबरला कार्तिकी एकादशी आळंदी : संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा 723 वा संजीवन समाधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!