Thursday , January 17 2019
Breaking News

मोदींना इंग्रजी बोलताना टेलिप्रॉम्पटरची मदत लागते – ममता बॅनर्जी

कोलकत्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदीं इंग्रजीमध्ये एक ओळही व्यवस्थित बोलू शकत नाहीत. इंग्रजी बोलताना मोदींना सतत टेलिप्रॉम्पटरची मदत घ्यावी लागते अशी जोरदार टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ममता बॅनर्जी या मोदी सरकारच्या कडव्या टीकाकार म्हणून ओळखल्या जातात.

एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. इंग्रजीमध्ये काय बोलायचे आहे ते मोदी स्क्रिनकडे बघून बोलतात असे ममता बॅनर्जी यांनी म्हंटले आहे. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ योजनेतून बाहेर पडत असल्याचेही गुरुवारी जाहीर केले. देशभरातील १० कोटी गरीब जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पंतप्रधान मोदींनी गेल्यावर्षी ही योजना जाहीर केली होती.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

अंकितानं दिली रिलेशनशिपविषयीची कबुली!

मुंबई : ‘पवित्रा रिश्ता’ या शो मधून फेमस झालेली अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडेने प्रेक्षकांच्या मनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!