Tuesday , October 23 2018
Breaking News

युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला फासले काळे

मुंबई : इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने आक्रमक पाऊले उचलली असून गुरुवारी युवक काँग्रेसचे महाराष्ट्रातील अध्यक्ष सत्यजित तांबे-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले. मुंबईतील आंदोलनादरम्यान त्यांनी मोदींच्या पोस्टरला काळे फासले आहे.

पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा तसेच राज्याने लावलेले उपकर रद्द करून स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावा, यासाठी गुरुवारी राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलन केले. मुंबईतील आंदोलनात सत्यजित तांबे-पाटील सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असून त्यात सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात यांची तुलना केली असता गुजरातमधील पेट्रोल महाराष्ट्रातील पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील पंपांवर ‘स्वस्त पेट्रोल’ अशी जाहिरात करण्यात आली आहे. पालघर, डहाणू, तलासरी या भागातील वाहनचालक गुजरात राज्यात गेल्यानंतर पेट्रोलची टाकी भरून घेतात.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

जामनेर येथील पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा भुसावळात निषेध

प्रांताधिकार्‍यांना निवेदन ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी भुसावळ- जामनेर येथील ‘दैनिक लोकमत’चे पत्रकार लियाकतअली सैय्यद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!