Thursday , January 17 2019
Breaking News

रावेर पोलिसांकडून मोबाईल चोरास अटक

रावेर- मोबाईल चोरी प्रकरणी रावेर पोलिसांनी हुसेन हसन तडवी यास अटक केली असून आरोपीच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तालुक्यातील अहिरवाडी येथील किशोर प्रभाकर चौधरी यांचा महागडा विवो कंपनीचा मोबाईल हा 2017 मध्ये चोरीला गेला होता. हा मोबाईल तडवी याच्याकडे असल्याची गुप्त माहिती चौधरी यांना मिळाल्यानंतर त्यांनी रावेर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संशयीत तडवी याच्याकडील मोबाईलची व चौधरी यांच्याकडील मोबाईल बिलाची पडताळणी केल्यानंतर आयएमईनंबर मॅच झाल्याने तडवी यास अटक करण्यात आली. आरोपी विरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बिजू जावरे करीत आहेत.

About गणेश वाघ

हे देखील वाचा

अमित शहा यांच्या प्रकृतीत सुधारणा; एक-दोन दिवसात मिळणार डिस्चार्ज-भाजप

नवी दिल्ली-भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!