Sunday , January 20 2019
Breaking News

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला झटका; कर्नाटकात केवळ एका जागेवर विजय

बेंगळुरु : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधीच कर्नाटकमधील मतदारांनी भाजपला जोरदार झटका दिला आहे. भाजपला लोकसभेच्या तीन मतदारसंघातील पोटनिवडणुकीत केवळ एकाच जागेवर विजय मिळविता आला आहे. तर विधानसभेच्या आणि लोकसभेच्या दोन जागांवर मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले आहे.

भाजपाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा मानसपुत्र आणि खाण घोटाळ्यातील आरोपी जनार्दन रेड्डी यांच्या बळ्ळारी मतदारसंघात भाजपवर मोठी नामुष्की ओढवली आहे. काँग्रेसचे उमेदवार व्हीएस उग्राप्पा यांनी भाजपाच्या जे शांता यांच्यावर तब्बल 243161 इतक्या प्रचंड मतांनी विजय मिळविला आहे.

तर मंड्या लोकसभा मतदारसंघात जेडीएसचे उमेदवार एल आर शिवरामोगौडा यांनी भाजपच्या डॉ. सिद्धरामय्या यांचा 3,24,943 मतांनी पराभव केला. शिमोगा लोकसभा मतदारसंघात भाजपचे बी वाय राघवेंद्र यांनी जेडीएसच्या उमेदवारावर 52148 मतांनी विजय मिळविला. राघवेंद्र हे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांचे पुत्र आहेत. येडीयुराप्पा यांनी आमदारकीसाठी खासदारकीचा राजीनामा दिल्याने शिमोग्याची जागा रिकामी झाली होती.

कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता यांनी रामनगर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा 109137 मतांच्या फरकाने पराभूत केले. त्यांनी भाजपाचे एल. चंद्रशेखर यांचा पराभव केला आहे.

जमखंडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार न्यामगौडा यांनी भाजपावर 39480 मतांनी विजय मिऴविला असून भाजपाचे श्रीकांत कुलकर्णी यांचा पराभव झाला आहे.

अपवित्र मैत्रीलाच जनतेने स्वीकारले-मुख्यमंत्री
या निकालावर जेडीएसचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतदारांनी ‘अपवित्र मैत्री’लाच स्वीकारले असून भाजपला नाकारले आहे. हा काँग्रेस आणि जेडीएसच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. भाजपने आघाडीला ‘अपवित्र मैत्री’ म्हटले होते. आज यावर जनतेनेच स्पष्ट केले असल्याचे कुमारस्वामी म्हणाले.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

तुमच्याकडे दुसरं काम नाही का? – स्वरा भास्कर

मुंबई : स्वरा भास्करने क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांची पाठराखण केली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!