Thursday , January 17 2019
Breaking News

विक्रीसाठी आणलेल्या मांडूळासह दोघांना अटक

पिंपरी चिंचवड : विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किंमतीचे मांडूळ एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे केली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. हेमंत संजू पवार (रा. शिवाजीनगर), आकाश बापू वाघमारे (रा. बीटी कवडे रोड, भीमनगर, झोपडपट्टी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अभय महादेव भवारी (वय 38, रा. किरकीटवाडी, खडकवासला) यांनी फिर्याद दिली.
अडीच किलो मांडूळाची सुटका…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक रोडवर मोशी येथे काळजे पेट्रोल पंपाजवळ दोन व्यक्ती मांडूळ विक्रीसाठी आल्याचे एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तीन फूट लांब आणि अडीच किलो वजन असलेले एक मांडूळ आढळून आले. यावरून दोघांना अटक करून प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

About Shajiya Shaikh

हे देखील वाचा

उजनी धरणातून भीमा नदीत सोडले पाणी

8100 क्युसेक्सने विसर्ग : नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा इंदापूर : संक्रांतीच्या मुहुर्तावर उजनी धरणातून भीमानदीला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!