Monday , December 17 2018
Breaking News

विद्यार्थ्यांना औषधातून विषबाधा ; एका विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबई : महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या औषधांतून गोवंडीतील एका महापालिका शाळेतील १४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गोवंडीत असलेल्या संजय नगर मधील उर्दू माध्यमाच्या शाळेत ही घटना घडली. यात १२ वर्षांच्या चाँदनी साहिल शेख या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या शाळेतील विद्यार्थ्यांना कॅल्शियम तसंच, रक्तवाढीची औषधं दिली जात होती. सहा ऑगस्ट रोजी ही औषधं देण्यात आली होती. या औषधांची रिअॅक्शन झाल्याचं बोललं जातंय. मृत विद्यार्थिनी चाँदनी हिला टीबी होता, असंही आता सांगितलं जात आहे. या प्रकारामुळं गोवंडीतील पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

विषबाधा कशामुळं?

शाळेतील खिचडी खाल्ल्यानंतर ही गोळी घ्यायची असते. त्यामुळं विषबाधा नेमकी कोणत्या कारणामुळे झाली? गोळ्यांमुळं की खिचडीमुळं याविषयी संभ्रम आहे. गोळ्यांची पाकिटं ताब्यात घेऊन उपायुक्तांमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी नगरसेवक रईस शेख यांनी केली आहे.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

कोकण मंडळाची पुढच्या वर्षी ५ हजार घरांची सोडत

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांसाठी रविवार मोठ्या उत्साहात सोडत पार पडली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!