Wednesday , December 12 2018
Breaking News

वृद्धेला 40 हजारास गंडा

पिंपरी : आधार लिंक करण्यासाठी मोबाईलद्वारे खोटे बोलून बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून एका ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यातून 39 हजार 940 रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना कस्पटेवस्ती वाकड येथे घडली. अरुंधती तारानाथ जेरे (वय 74, रा. निसर्ग सृष्टी अपार्टमेंट, कस्पटेवस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोठून बोलताय म्हटल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केशवापूर शाखेतून बोलत असल्याचे पलिकडून सांगितले. एटीएम कार्डची गोपनिय माहिती विचारण्यात आली. अरुंधती यांनी सर्व माहिती दिल्यानंतर त्यांच्या खात्यातून 39 हजार 940 रुपये काढून घेतल्याचे त्यांना समजले.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेला मोठा प्रतिसाद

पुरुष गटात पुण्याचा विश्‍वास गायकवाड, तर महिला गटात इंग्लंडची अलेक्सांड्रा मूर विजेती पुणे : वेस्टर्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!