Wednesday , December 12 2018
Breaking News

सत्ताधार्‍यांमध्ये पुन्हा फाटले – पवनाथडीवरून वादाची परंपरा कायम

जत्रा भरणार कोठे? भोसरी की चिंचवड! 
पिंपरी-चिंचवड : महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी महापालिकेतर्फे भरविण्यात येणा-या पवनाथडी जत्रेला वादाची परंपरा यंदाही कायम आहे. जत्रेचे ठिकाण भोसरी असावे की चिंचवड यावरुन सत्ताधारी नगरसेवकांमध्ये मत-मतांतरे असून महिला व बालकल्याण समितीने दोन परस्परविरोधी ठराव केले. अगोदर भोसरीगाव जत्रा मैदान येथे जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात जत्रा भरविण्याबाबतचा ठराव केला. त्यानंतर अचानक पुन्हा सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात फेब्रुवारीमध्ये जत्रा भरविण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे जत्रेच्या ठिकाणावरुन संभ्रमावस्था कायम आहे. तसेच वादाची पंरपरा देखील कायम राहिली आहे.
पैसा पालिकेचा, भांडणार पदाधिकारी
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवारी पार पडली. सभापती स्वीनल म्हेत्रे अध्यक्षस्थानी होत्या. पुण्यातील भीमथडी जत्रेच्या धर्तीवर सुमारे दहा वर्षांपूर्वी पासून पवनाथडी जत्रा भरविण्यास सुरुवात केली. महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेतर्फे महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे 12 वर्ष आहे. ती भरविण्याच्या ठिकाणावरुन तत्कालीन सत्ताधार्‍यांमध्ये नेहमीच मतभेद होत होते.
गेल्यावर्षीही जादा खर्चावर आक्षेप
फेब्रुवारी 2017 मध्ये सत्तांतर होऊन महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. गतवर्षी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी जत्रेतून महिला बचत गटांना यथावकाश फायदा होत नसल्याचे सांगत  जत्रा स्थगित करण्याची मागणी केली होती. तसेच खर्च जास्त होत असल्याचा आक्षेप देखील त्यांनी घेतला होता. त्यानंतर जत्रेचा खर्च 80 लाखावरुन 45 लाखांवर आणण्यात आला. त्यानंतर जत्रा भरविण्यात आली होती. यंदा पुन्हा पवनाथडी जत्रा भरविण्यावरुन संभ्रामवस्था निर्माण झाली आहे.
एकाने ठराव केला, दुसर्‍याने बदलला
महिला व बालकल्याण समितीच्या आज झालेल्या सभेत अगोदर भोसरीगाव जत्रा मैदान येथे जानेवारी 2019 च्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात जत्रा भरविण्याबाबतचा ठराव केला. त्यानंतर पुन्हा सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात फेब्रुवारी 2019 च्या पहिल्या अथवा दुस-या आठवड्यामध्ये जत्रा भरविण्याचा ठराव केला. त्यामुळे जत्रेच्या ठिकाणावरुन संभ्रामवस्था कायम आहे. तसेच जत्रेला वादाची पंरपरा देखील कायम राहिली आहे.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेला मोठा प्रतिसाद

पुरुष गटात पुण्याचा विश्‍वास गायकवाड, तर महिला गटात इंग्लंडची अलेक्सांड्रा मूर विजेती पुणे : वेस्टर्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!