Thursday , January 17 2019
Breaking News

समाविष्ट 12 गावांचा ’टीपी स्कीम’ नुसार विकास 

पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या वतीने समाविष्ट गावातील 12 भागांत टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीमनुसार विकास केला जाणार आहे. आराखडा व नियोजन करून रस्ते बांधून त्या भागांचा विकास केला जाणार आहे. महापालिकेच्या 19 जानेवारी रोजी होणार्‍या महासभेत त्याला मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर राज्य सरकारच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रथम टीपी स्कीमचा प्रथमच स्वीकार केला आहे. या संदर्भात अहमदाबादच्या एचसीपी कंन्सल्टंटच्या प्रतिनिधींनी गुरूवारी (दि.9) चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात नगरसेवक व पदाधिकार्‍यांना त्या संदर्भातील सादरीकरण केले. यावेळी महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
टप्प्याटप्याने होणार निवड…
या अंतर्गत शहरातील थेरगाव, चिखली, चिंचवड, चर्होली, रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, डुडुळगाव, मोशी, बोर्हाडेवाडी या 12 भागांचा विकास केला जाणार आहे. त्यामध्ये प्रत्येक विभागात 39 हेक्टर ते 391 हेक्टर इतक्या क्षेत्रफळांचा विकास होणार आहे. शहरातील 30, 50 व 70 टक्के विकास झालेल्या भागांचा प्रथम टप्प्यात निवड करण्यात आली आहे.
नियोजनबद्ध विकासावर भर…
विकास कामे करताना जागामालकांवर अन्याय होऊ नये, म्हणून टीपी स्कीमचा वापर होतो. सर्वांकडून समप्रमाणात जागा ताब्यात घेऊन प्रथम रस्ते विकसीत केले जाणार आहे. त्यामुळे सर्व बाधितांना चौकोनी आकाराचे रस्त्याच्या दर्शनी भागात जागा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्या भागांचा नियोजनबद्ध विकासावर भर राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पन्नास टक्के पेक्षा अधिक जागा ताब्यात घेतल्यास त्यांना पूर्वीच्या 1 एफएसआय पेक्षा अधिक एफएसआर मिळणार आहे.
आराखडा सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी…
चांगल्या दर्जाचा आराखडा तयार व्हावा, म्हणून एचसीपी कंन्सल्टंटची निवड केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 30 टक्के विकास झालेल्या भागासाठी प्रति हेक्टरसाठी 19 हजार , तर 50 टक्केपर्यंत विकास झालेल्या भागात 17 हजार 500 आणि 70 टक्केपर्यंत विकास झालेल्या भागासाठी 21 हजार 500 रूपये प्रतिहेक्टर शुल्क आराखडा तयार करण्यासाठी दिला जाणार आहे. महापालिकेच्या येत्या 19 जानेवारीला होणार्‍या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन हे काम प्रत्यक्ष सुरू केले जाणार आहे.

About Shajiya Shaikh

हे देखील वाचा

अंकितानं दिली रिलेशनशिपविषयीची कबुली!

मुंबई : ‘पवित्रा रिश्ता’ या शो मधून फेमस झालेली अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडेने प्रेक्षकांच्या मनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!