Monday , December 17 2018
Breaking News

हडपसरमध्ये गुरुजन सन्मान सोहळा

हडपसर : गुरुपौर्णिमेनिमित्त हडपसर मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित गुरुजन सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम अमनोरा पार्क टाऊन कल्ब येथील सभागृहात संपन्न झाला. हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने हडपसर परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तीमत्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर असोसिएशनच्या सभासदांच्या पाल्यांनी दहावी बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले त्यांचा गुणगौरव तसेच डॉक्टर्स डे, अवयवदान जनजागृती फेरी आणि पथनाट्य कलाकार यांचाही सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ अरुण जामकर होते. प्रत्येक गुरूचे मुल्यांकन हे त्याच्या शिष्यांच्या प्रगतीवरून केले जाते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, आज इथे गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मानित होणारे बहुसंख्य हे माझे विद्यार्थी आहेत, असे त्यांनी सांगितले. इतर प्रमुख अतिथीं मध्ये येरवडा कारागृह अधीक्षक विठ्ठल जाधव, अशोक गोडसे, रोहित पवार तसेच अ‍ॅड. ढगे याप्रसंगी होते. हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, सचिव डॉ. सचिन अबणे व कोषाध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हिमांशू पेंडसे आणि डॉ. इलियास मोमीन यांनी केले. असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. मंगेश वाघ यांनी आभार मानले.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

कोकण मंडळाची पुढच्या वर्षी ५ हजार घरांची सोडत

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांसाठी रविवार मोठ्या उत्साहात सोडत पार पडली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!