Thursday , January 17 2019
Breaking News

हद्दपार ‘डॉन’ला रामानंदनगर पोलिसांकडून अटक

जळगाव- ‘डॉन को पकडना मुश्किलही नही बल्की नामुमकीन है’, याप्रमाणे शहरात वावरत असलेल्या हद्दपार आरोपी संजय पोपटकर उर्फ डॉन याला अटक करुन ‘पोलिसांनी कानून के हात लंबे होते’ याचा प्रत्यय दिला आहे. शनिवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला शहरातून ताब्यात घेतले आहे.

अमिताभ बच्चनची प्रमुख भुमिका असलेला प्रसिध्द व बहुचर्चित हिंदी चित्रपट म्हणजे डॉन. हा चित्रपट कथानकाप्रमाणे त्याच्यातील अमिताभ बच्चनच्या  मुखातून निघालेल्या संवादामुळेही गाजला होता. असाच गाजलेला एक संवाद म्हणजे म्हणजे डॉन को पकडना मुश्किल नही बल्की नामुमकीन है हा आहे. या चित्रपटातील डॉनच्या भुमिकेप्रमाणेच स्वतः डॉन म्हणवून घेणार्‍या संजय पोपटकर उर्फ डॉन याला गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातून हद्दपार क रण्यात आले आहे. हद्दपार असतानाही तो संशयितरित्या महाबळ परिसरातील संत गाडगेबाबा चौकात असल्याची गोपनीय व खात्रीशीर माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी, प्रदीप चौधरी, अनमोल पटेल, विकास शिंदे, ज्ञानेश्‍वर कोळी, विजय खैरे या पथकाने संजयला अटक केली आहे. त्याच्या विरोधात रामानंदनगर पोलिसात भाग 6 गुरन 3022/2019 महाराष्ट्र पोलीस कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास गोपाळ चौधरी हे क रीत आहेत.

About Kishor Patil

हे देखील वाचा

भुसावळात जुगाराचा डाव उधळला :  6 जुगारी जाळ्यात

भुसावळ :  शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दितील पंचमुखी हनुमान मंदीराजवळील लक्ष्मी अॅटाे गॅरेजच्या बंद खाेलीतील जुगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!