Friday , September 21 2018
Breaking News

२८ सप्टेंबरला मेडिकल दुकानदारांचा देशव्यापी संप

पुणे : औषधांची आॅनलाईन (ई फार्मसी) आणि पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या विक्रीला विरोध दर्शविण्यासाठी आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टने २८ सप्टेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. आॅनलाईन कंपन्या कायद्यात असलेल्या कोणत्याही जबाबदारीचे पालन न करताच औषधांची मागणी नोंदवीत आहेत.

गर्भपात किट (एमटीपी), सिल्डेनफिल, टॅडलफिल, कोडेन यांसारखी गुंगी आणणारी औषधे देखील आॅनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. जुन्या अथवा बनावट चिठ्ठीवरदेखील औषधे देण्याचे प्रकार घडत आहेत. डॉक्टरांची बनावट ई चिठ्ठी तयार केली जाते. यामुळे मेडिकल दुकानदारांमध्ये अस्वस्थता आहे.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

निपाणे येथील एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

निपाणे- एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील माधवराव राजाराम पाटील (वय 42) यांचा गुरुवारी दुपारी 3.30 वाजता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!