Thursday , January 17 2019
Breaking News

1 कोटी तस्करीचे सोने जप्त

पुणे : दुबईहून आलेल्या स्पाईस जेट एअरवेजच्या विमानातील टॉयलेटमध्ये एक किलो सोन्याचे 4 बार असे 4 किलो सोने तस्करी करून आणल्याचे आढळून आले. पुणे विमानतळावरील कस्टम अधिकार्‍यांनी हे 1 कोटी 29 लाख 4 हजार रुपयांचे हे सोने जप्त केले आहे.

दुबईहून गुरुवारी पहाटे 4 वाजून 25 मिनिटांनी स्पाईस जेट फ्लाईट एसजी-52 हे पुणे विमानतळावर उतरले. कस्टम अधिकारी तपासणी करीत असताना विमानातील टॉयलेटमध्ये काळ्या टेपमध्ये गुंडाळून ठेवलेले चार सोन्याचे बार कस्टम अधिकारी देशराज मिना यांना ते आढळून आले. त्यावर परदेशी मार्क दिसून आले. सह आयुक्त राजेश रामाराव, उपायुक्त हर्षल मेटे, अधिक्षक सुधार अय्यर, संजय झरेकर, सतीश सांगळे, राजेंद्र प्रसाद मिना, जी. जे. जोशी, बी. एस. हगावणे, एस. एस. निंबाळकर आणि ए. ए. भट यांचा पथकाने हे सोने ताब्यात घेऊन जप्त केले आहे. यापूर्वी दुबई, आबुदाबीहून येणार्‍या आंतरराष्ट्रीय फ्लाईट व पुढे ज्या डोमेस्टिक फ्लाईट होतात. त्यातील टॉयलेटमध्ये, सीटखालील रेक्झीनमध्ये सोने लपवून आणण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

बेघरांना मिळणार हक्काचे घर

जिल्ह्यातील 1 हजार 868 घरकुलांच्या उद्दिष्टांना मंजुरी पुणे : रमाई आवास योजने (ग्रामीण) अंतर्गत मातंग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!