Tuesday , October 16 2018
Breaking News

115 कोटीच्या विकास कामांना मंजुरी

स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय

पिंपरी-चिंचवड : शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणार्‍या सुमारे 115 कोटी 90 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महापालिका क्षेत्रातील बोर्‍हाडेवाडी येथे 1288 निवासी सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात येणार असून त्यासाठी 112 कोटी 18 लाख, भोसरी स.नं.एक मधील दवाखाना इमारतीसाठी बैठक व्यवस्था करणे व स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 73 लाख 38 हजार, महापालिका मुख्य कार्यालय व इतर विविध कार्यालयांचे नेटवर्किंगचे दुरुस्ती व देखभाल कामकाजासाठी एक कोटी 38 लाख 90 हजार या खर्चाचा समावेश आहे.

जिजाऊ पर्यटन केंद्र

महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र संगणक प्रणाली देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे 22 लाख 41 हजार, पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडील प्रभाग ‘अ’, ‘ब’ आणि ‘फ’ पंपीग स्टेशनमधील स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 45 लाख 17 हजार, उद्यान विभागाकडील जिजाऊ पर्यटन केंद्र भाग एक व दोन पार्वती उद्यान चिंचवड देखभाल व संरक्षण करण्यासाठी 41 लाख 14 हजार खर्चासही मान्यता देण्यात आली.

बेकायदा जाहिरातदारांना दंड

महापालिकेच्या मिळकतीवर व सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे लावणेत येणा-या हँडबिल्स, कागदी भिंती पत्रके लावून शहराचे विद्रुपीकरण करणा-या जाहिरात धारकांना 750 रुपये प्रती चौरस मीटर इतके प्रशमन शुल्क आकारणेस मान्यता देऊन अंतिम मान्यतेसाठी हा विषय महापालिका सभेकडे पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

About Mahadev Gore

हे देखील वाचा

पश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार

कोलकाता- पश्चिम बंगालमधील हुगळी येथे प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात कोसळून ६ ठार तर २० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!