Tuesday , August 21 2018
Breaking News

अनिल अंबानी यांना होणार अटक?

मुंबई-रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याविरोधात बिहारच्या मधेपुरा सिव्हिल कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोबदला न दिल्याने ही कारवाई करण्यात येत आहे.

मधेपुरा जिल्ह्यातील बेहरी गावाचे रहिवासी सैनी साह यांचा १३ जुलै २०११ ला आसामच्या तिलोई गावात ट्रक अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढला होता. १६ ऑगस्ट २०११ रोजी सैनी यांची आई कौशल्या देवी यांनी मोबदल्यासाठी विमा कंपनीवर दावा दाखल केला होता. त्यावर कोर्टाने सैनी यांच्या कुटुंबियांस २८ फेब्रुवारी २०१७ रोजी १८ लाख ८३ हजार रुपये आणि त्यावर ९% टक्के वार्षिक व्याज देण्यास सांगितले. पण तरीही मोबदला न मिळाल्याने कौशल्या देवी यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात कंपनीला दोनवेळेस नोटीस पाठवली होती परंतू उत्तर दिले नाही.

त्यानंतर कंपनीचे चेअरमन अनिल अंबानी यांना अटक करण्याचा अर्ज कोर्टात दाखल करण्यात आला, तसेच न्यायालयाकडे महाराष्ट्राच्या डीजीपी यांच्या माध्यमातून अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याची विनंती करण्यात आली. अखेर न्यायालयाने ही विनंती स्वीकारत अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा

मुंबई :राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.