Monday , July 23 2018

लेख

रवींद्र मराठे यांची राजकीय पाठराखण

      पुण्यातील डीएसके घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालल्याने फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांची झोप उडाली आहे. मोठ्या कष्टाने, घाम गाळून कमावलेले पैसे परत कधी मिळणार? मिळणार की नाही? अशा विचाराने या गुंतवणुकदारांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. गुंतवणुकदारांच्या या स्थितीबाबत एक शब्द न बोलणारे राजकीय नेते रवींद्र मराठेंच्या अटकेवर मात्र भरभरून …

अधिक वाचा

योगसाधना : निरोगी जीवनाची गुरूकिल्ली

योग साधना म्हणजे काय ? ‘समत्वं योग उच्यते ।’ ‘चित्तवृत्ती निरोधः।’ म्हणजे शरीर व मन चंचल होण्यापासून रोखणे. योग शब्दांचा सोपा अर्थ जोडणे. योगामुळे संपूर्ण शारिरीक, मानसिक, सामाजिक स्वास्थ मिळते. त्यामुळे योगसाधनेला ‘होलिस्टिक सायन्स’ म्हणतात. योग म्हणजे अनुशासीत जीवन जगणे होय. योग म्हणजे सबबी, कारणे सोडून स्वतःसाठी वेळ काढत, स्वतःशीच …

अधिक वाचा

शिक्षण घेता – देता ‘मूल्यशिक्षण’ चे धडे द्यावेत !

सर्व शाळांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान शिकवण्याआधी मूल्यशिक्षण देणे आवश्यक आहे. कारण शालेय मुले एकतर हिंसक बनत चालली आहे वा गुन्हेगारी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग वाढत चालला आहे…’ असं मत मुंबई उच्च न्यायालयात मांडले गेले. या पार्श्‍वभूमीवर शाळेतील मुलामुलींना दरोजचं शिक्षण घेता-देता मुल्यशिक्षणाचे प्राथमिक धडे खरंच देता येतील का? व ते कसे …

अधिक वाचा

कॉलेजच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी!

खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आल्याचा आदेश शिक्षण विभागाने जारी केल्याची बातमी नुकतीच वाचण्यात आली. सरकारला उशिरा का होईना या बाबीची जाणीव झाली की, कॉलेजमध्ये हजेरीवर जेवढे विद्यार्थी असतात त्यांच्या निम्यापेक्षा कमी विद्यार्थी उपस्थित असतात, असे कॉलेजचे चित्र एकीकडे दिसते …

अधिक वाचा

‘सीआयए’च्या उलट्या बोंबा!

‘सीआयए’ (सेन्ट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने यावर्षी प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड फॅक्ट बूक’मध्ये ‘विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल या धार्मिक आतंकवादी संघटना आहेत, तर जमियत उलेमा-ए-हिंद ही धार्मिक संघटना आहे’, असा उल्लेख केला आहे. याला ‘फॅक्ट’ म्हणण्यापेक्षा ‘फेक अ‍ॅलिगेशन्स’ म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. याचा शासन स्तरावर ठोस प्रतिवाद …

अधिक वाचा

भाजपला कानपिचक्या!

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारे यानेच केल्याचा निष्कर्ष या प्रकरणाचा तपास करणार्‍या विशेष तपास पथकाने (एसआयटी) काढल्याने खळबळ उडवून देणारा हा विषय एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन श्रीराम सेनेची वक्तव्ये येऊ लागली आहेत. सीआयएने बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेला दहशतवादी संबोधले आहे. …

अधिक वाचा

राजकीय प्रवासात जनमत महत्त्वाचे!

माझा राजकीय प्रवास पूर्ण व्हायचा आहे. कारण राजकारणी लोक कधीच निवृत्त होत नाहीत, ते काळाच्या आड आपोआप लुप्त होतात. मरायला टेकलेला माणूस सत्तेत आला की टवटवीत होतो. जसे मी नरसिंह राव बघितले. एरवी राजकारण सोडलेला माणूस राजीव गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधान झाला. भारताच्या इतिहासातील हे एक गूढ आहे. राजीव गांधींचे मारेकरी …

अधिक वाचा

ही विकृती नष्ट व्हायला हवीय..!

लोकांची विकृती अगदी तळाच्याही खालच्या टोकाला जात असलेल्या समाजात आपण राहतोय, याची खरोखर किळस येतेय. आपण या अशा समाजात का बरे जन्मलो, असा सवाल काही घटना घडल्यानंतर नेहमीच कुठल्याही संवेदनशील असलेल्या माणसाला पडत असेल. जामनेर तालुक्यात वाकडी (जि. जळगाव) गावात घडलेली घटना निश्‍चितपणे महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. …

अधिक वाचा

मराठ्यांची राजकीय कळवंड!

आगामी 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोषित केले. त्याअनुषंगाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी त्यांच्या चर्चेच्या फेर्‍याही झाल्या आहेत. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात फिफ्टी-फिफ्टी म्हणजे 50-50 टक्के जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे महाराष्ट्र …

अधिक वाचा

कुटुंबात वडिलांची भूमिका

मानवी जीवनात आई-वडील हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. परंतु, वडिलांपेक्षा आपण सर्वच जण आईला सर्वात जास्त महत्त्व देतो. कारण आई ही प्रत्येक मुलाला आपल्या उदरात नऊ महिने नऊ दिवस अतिशय काळजीपूर्वक सांभाळ करते. गर्भात जुळलेली नाळ आयुष्यभर टिकून राहते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तिचा आणि मुलाचा जिव्हाळ्याचा, प्रेमाचा संबंध असतो. …

अधिक वाचा
error: Content is protected !!