Wednesday , November 21 2018
Breaking News

Mahadev Gore

सरकार जनतेची दिशाभूल करत आहे – जयंत पाटील

मुंबई : सरकार वारंवार पुरवणी मागण्या मांडून जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. आजही सरकारने २० हजार कोटींच्यावर पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यापूर्वी मांडलेल्या पुरवणी मागण्यांचा विनियोगही सरकारने केला नाही. त्यातच पुन्हा पुरवणी मागण्या मांडल्या जात असल्याचेही पाटील यांनी सांगितले. सरकारने आधीच अनेक …

अधिक वाचा

15 डिसेंबरपासून प्लास्टिक उत्पादन बंद ठेवणार

उत्पादक कंपन्यांचा निर्णय; ‘ईपीआर’अंतर्गत पुनर्संकलनाची जबाबदारी उत्पादकांवर पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक उत्पादक कंपन्यांना विस्तारित उत्पादक जबाबदारी (ईपीआर) अंतर्गत प्लास्टिकच्या पुनर्संकलनप्रकरणी कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे 15 डिसेंबरपासून उत्पादनच बंद ठेवण्याच्या निर्णयापर्यंत या कंपन्या आल्याचे समजते. त्याचा पहिला फटका दूध, खाद्यतेले आणि अन्य खाद्यांन्न …

अधिक वाचा

‘मेट्रो’चा पर्यायी मार्गांचा शोध सुरूच

pune_metro_logo

पुणे : आगाखान पॅलेससमोर मेट्रोच्या बांधकामाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे  कॉर्पोरेशन’कडून (महामेट्रो) अद्याप पर्यायी मार्गांची चाचपणी सुरू आहे. पर्यायी मार्गांवरील अपेक्षित प्रवासीसंख्या आणि त्यामुळे वाढणारा खर्च, याचा ताळमेळ घालण्याचे काम सध्या सुरू असून येत्या काही दिवसांत त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे संकेत ‘महामेट्रो’ने दिले. राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाने …

अधिक वाचा

रेल्वेस्थानकाच्या फलाट वाढीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू

नवी मुंबई : पनवेल रेल्वेस्थानकाच्या फलाट वाढीसाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यात तीन मुली बुडून मृत पावल्याची घटना घडली आहे. रेल्वेस्थानक लगतच्या मोकळ्या जागेत मुली खेळत असताना सदरील घटना घडली. रेशम भोसले (१३), रोहिता भोसले (१०) व प्रतीक्षा भोसले (०८) अशी मृत मुलींची नावे आहेत. तिघीही मूळच्या अमरावतीच्या असून कुटुंबासोबत रस्त्यावर फुगे …

अधिक वाचा

आईची शिकवण आणि डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रोत्साहनाने खर्‍या अर्थाने घडविले

डॉ. टेसी थॉमस : ‘कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला संशोधन राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान पुणे : शिक्षण हे आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असून सतत शिकत राहायचे ही आईची शिकवण आणि एका यशानंतर आता पुढे काय, याचा सतत ध्यास घ्यायचा असे प्रोत्साहन देणारे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम या दोन व्यक्तींनी माझे …

अधिक वाचा

‘अटल’सूर्याच्या तेजाची ओळख सांगणाऱ्या काजव्यांची गरज”

धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली मुंबई : देशाच्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात आज अंधाराचं, भीतीचं वातावरण आहे. देशवासियांच्या मनात एकाधिकारशाही, हुकुमशाहीची भीती दाटून आली असताना ‘अटल’सूर्याच्या तेजाची ओळख समाजाला करुन देण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य काजव्यांची आज गरज आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे …

अधिक वाचा

‘पुलं’ माझे दैवत, तर त्यांचे साहित्य म्हणजे संजीवनी – ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ

पुलोत्सवात चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पुणे : विनोद सादर करण्यामागच्या जडणघडणीत पुलंच्या साहित्य अन्य कलाकृतींचा मोठा वाटा आहे. पुलंच्या अनेक पुस्तकांचा खजिना माझ्या घरी आहे. पुलंचा विनोद हा शाब्दिक नाही, तर तो बिटवीन द लाईन्स असतो. पुलं हे माझे दैवत, तर त्यांचे साहित्य संजीवनी आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ …

अधिक वाचा

बारामती शहर ठरले अस्वच्छ

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत 138व्या स्थानावर; इंदापूर, भोर, सासवड ही शहरेही ठरली वरचढ बारामती : स्वच्छ सर्वेक्षण 2018च्या स्पर्धेत बारामती शहर अस्वच्छ ठरले आहे. राज्यातील एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत एकूण 217 शहरांमध्ये बारामती 138व्या स्थानावर फेकले गेले होते. जिल्ह्यातील इंदापूर, भोर, सासवड ही शहरेही बारामतीपेक्षा वरचढ ठरली. त्यानंतर …

अधिक वाचा

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना प्रशिक्षण

विद्या प्राधिकरणातर्फे परीक्षापद्धती, मूल्यमापन चाचण्या यांचे प्रशिक्षण पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (विद्या प्राधिकरण) राज्यातील पाच लाख शिक्षकांनी वर्षभरात विविध विषयांचे प्रशिक्षण घेतले आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी या प्रशिक्षणाचा शिक्षकांना नक्कीच फायदा होऊ लागला आहे. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली असता यंदा सर्वाधिक 5 लाख …

अधिक वाचा

दिव्यांग व्यक्तींना योजनांचा लाभ घेण्यासाठी करावी लागते अडथळ्यांची शर्यत

सोयी-सुविधांचा लाभ जागतिक अपंग दिनापूर्वी देण्याची प्रहार संघटनेची मागणी पुणे : हजारो अपंग जिल्ह्यामध्ये सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. त्यामुळे येत्या 3 डिसेंबरपर्यंत अपंगाना लाभ मिळण्यासाठी शासकीय स्तरावर तात्काळ सूचना द्याव्यात, अन्यथा अपंगांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा प्रहार अपंग …

अधिक वाचा
error: Content is protected !!