Tuesday , October 23 2018
Breaking News

Shajiya Shaikh

एजाज खानला अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक

मुंबई : बिग बॉसमधून लाइम लाइट मिळवणारा एजाज खानला बेलापूरमधल्या ‘के स्टॉर’ हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. एजाजला ड्रग्स प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचं समजलं आहे. सध्या एजाजची पोलीस चौकशी करत असून दुपारी दोन वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. …

अधिक वाचा

कुत्रा हरविल्याची तक्रार

सांगवी : सांगवी पोलीस ठाण्याच्या पोलिसांवर आता गुन्हेगार सोडून चक्क कुत्रा शोधण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पोलीस कर्मचारी सीसीटीव्हीची मदत घेत आहे. ही घटना नवी सांगवी पोलीस चौकीच्या परिसरात घडली आहे. याप्रकरणी कुत्र्याच्या मालकिणीने सांगवी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली आहे. गुन्हेगाराच्या मागावर असणार्‍या पोलिसांना वेगवेगळ्या तक्रारींना सामोरे जावे लागत …

अधिक वाचा

फक्त भोसरीतील विकासकांना नोटीस का?

विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांची चौकशीची मागणी; आयुक्तांवर आर्थिक हितसंबंधाचा घेतला संशय पिंपरी चिंचवड : भोसरीतील विकसकांना महापालिकेच्या बांधकाम विभागाने नोटीस बजाविल्याने यात कोणाचे तरी हितसंबंध गुंतल्याचा दाट संशय आहे. पिंपरी- चिंचवडमधील विकसकांना वगळून तसेच निवडणूका डोळ्यासमोर ठेवून विकसकांची कोंडी करुन त्यांच्याकडून वसुली करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप विरोधी …

अधिक वाचा

वृध्दाश्रमांची वाढती संख्या ही शोकांतिका – श्रीरंग बारणे

पिंपरी : आपण आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यास आपली मुले देखील आपल्याला वृद्धाश्रमात ठेवतील. कारण आपलेच अनुकरण आपली मुले करतील. वाढत्या लोकसंख्येमुळे समस्या वाढत आहे. समाज बांधवांनी एकत्र आल्यास समाजातील समस्या कमी होतील. समाज प्रवाहात वावरत असतो. आजकालची मुले आपल्या आई-वडीलांचा सांभाळत करत नसल्याने समाजात वृद्धाश्रमाची संख्या वाढली आहे. ही शोकांतिका …

अधिक वाचा

अधिकार्‍यांनो पाणी द्या, नाहीतर राजीनामे द्या !

नगरसेवक डोळस यांनी केली मागणी पिंपरी : नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी आम्ही भांडत आहोत. अधिकारी केवळ तांत्रिक अडचण असल्याची कारणे देतात. अभियंत्यांना तांत्रिक समस्या सोडविता येत नाहीत का? कामचुकार अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी. अधिकार्‍यांनो पाणी द्या, नाहीतर राजीनामे द्या, अशी आक्रमक भूमिका भाजपचे नगरसेवक व स्थायी …

अधिक वाचा

रविवारी केनल क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने 112 व 113वी चॅम्पियनशीप डॉग शो पडला पार

देश-विदेशातील 40 जातीचे श्‍वान पाहण्यासाठी श्‍वानप्रेमींची झाली गर्दी श्‍वानांना पाहुन पिंपरी-चिंचवडकर झाले दंग पिंपरी : श्‍वान घरात असलं की, संरक्षणाची हमी वाटते. त्याला माणसं देखील ओळखता येतात. मालकाची सेवाही तो चोख बजावतो. श्‍वानांचे आणि मालकांचे विशेष नाते असते. श्‍वान विशेष प्रशिक्षित असतात. हे सर्व काही पहायला मिळाले चिंचवडमध्ये आयोजित डॉग …

अधिक वाचा

सोनसाखळी हिसकावली

निगडी : परिसरामध्ये आपल्या मैत्रीणीसोबत पायी चाललेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. ही घटना प्राधिकरण येथे शुक्रवारी घडली. जया मुरलीधर रमानी (वय 66, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जया या शुक्रवारी सायंकाळी प्राधिकरणातील लक्ष्मी कॉलनीतील विवेक मित्र मंडळाजवळून मैत्रिणींसोबत रस्त्याने …

अधिक वाचा

भोसरीत देशी कट्टा जप्त

भोसरी : एका 22 वर्षीय तरुणाकडून देशी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई भोसरी एमआयडीसी पोलिसांनी लांडेवाडी चौकात केली. कुलदीप लालदेव चौहान (वय 22, रा. चक्रपानी वसाहत, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय दीपक दौंडकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी …

अधिक वाचा

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार जगताप

सांगवी : निर्मला कुटे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. प्रथमच निवडून येऊनही गेल्या दीड वर्षातील त्यांचे काम कौतुकास्पद आहे. सातत्याने पाठपुरावा करून त्या प्रभागातील कामे मार्गी लावतात. पिंपळे सौदागर परिसरात पुढील 20 वर्षांचे नियोजन करूनच कामे केली जात आहेत. या भागाच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही, …

अधिक वाचा

काही कारणामुळे रजेवर असल्यास प्रशासकीय कामकाजात अडचणी

विभागप्रमुखांच्या गैरहजेरीतील अतिरिक्त जबाबदारीवर तोडगा अतिरिक्त पदभाराची जबाबदारी निश्‍चित पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील संबंधित विभागाचे विभागप्रमुख रजा, सुट्टी आणि प्रशिक्षण किंवा अन्य काही कामामुळे रजेवर असल्यास प्रशासकीय कामकाजात अडचणी येतात. तसेच प्रत्येकवेळी अतिरिक्त पदभाराचा वेगळा आदेश पारित करावा लागतो. त्यासाठी अधिकार्‍यांच्या रजा काळातील अतिरिक्त पदभारांचे नियोजन करण्यात आले आहे. विभागप्रमुखाच्या …

अधिक वाचा
error: Content is protected !!