Sunday , September 23 2018
Breaking News

गुन्हे वार्ता

गावठी कट्टा प्रकरणी एकाला अटक

सांगवी : गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई सांगवी पोलिसांनी ममतानगर येथील बालयोगी आश्रमाजवळ केली. उमेश सुरेश पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बालयोगी आश्रमाजवळ एक इसम संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची …

अधिक वाचा

साईनाथनगरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ

दिवसाढवळ्या केली गाड्यांची तोडफोड निगडी : दिवसाढवळ्या 15 ते 18 जणांच्या टोळक्यांनी सशस्त्रांसह निगडी, साईनाथनगरमध्ये धुमाकूळ घातला. धारदार हत्यारांनी रस्त्यांवर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निगडीतील, साईनाथनगर परिसरात दुपारी सव्वा दोनच्या सुमारास 15 ते 18 जणांचे टोळके आले. …

अधिक वाचा

उघड्यांवर मांस विक्री करणाऱ्या आठ जणांवर कारवाई

मास्टर कॉलनी भागात मनपा पथकाची कारवाई जळगाव – शहरातील मास्टर कॉलनी भागात शुक्रवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनपाच्या आरोग्य आणि अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई करून अवैधरित्या मांस विक्री करणाऱ्या 8 विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून मांसविक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात …

अधिक वाचा

दुचाकी-स्कुलव्हॅनच्या अपघातात तीन ठार

दुचाकीचा झाला चुराडा पाळधी पोलीसात अपघाताची नोंद जळगाव – जळगावात खासगी रूग्णालयात दाखल असलेल्या पत्नीला पाहण्यासाठी दुचाकीने शालकासोबत एरंडोलकडून जळगावकडे जात असतांना भरधाव दुचाकी समोरून येणाऱ्या टाटा मॅजिकला जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवार दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास जळगाव-पाळधी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सुझोगी जवळ झालेल्या आपघातात दुचाकीचालक आणि टाटामॅजिक चालक …

अधिक वाचा

राजीव गांधी नगरातून शस्त्रसाठा हस्तगत !

रामानंदनगर पोलिसांची कारवाई : 3 तलवारी, 3 सुरे जप्त जळगाव – शहरात सणोत्सवाच्या काळात रामानंदनगर पोलिसांनी धडक कारवाई करीत राजीव गांधी नगरातून मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. पथकाने केलेल्या कारवाईत तीन तलवार आणि तीन सुरे ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक …

अधिक वाचा

खडकी बुद्रूक येथे अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न; तरूणाविरोधात गुन्हा दाखल चाळीसगाव- तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना 20 सप्टेंबर दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली असून घाबरुन तरुणीने फिनाईल पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिची प्रकृती स्थिर असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तरुणाविरोधात विनयभंगासह अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

अधिक वाचा

दुचाकी रोडवरून घसरल्याने तरूण गंभीर

जळगाव – सुटी असल्याने दुचाकीने गावाकडे आईला पैसे देण्यासाठी जात असलेल्या तरूणाचा पिंप्री गावाजवळील वळणावर दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी झाला असून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत धरणगाव पोलीसात नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, भरत पांडूरंग कोळी (वय-29) …

अधिक वाचा

फरार आरोपीला पोलिसांनी पकडले

जळगाव – बनावट धनादेश देवून प्लॉट खरेदी करून जागा मालकाची फसवणूक केल्याची प्रकरणी रामानंद पोलिस ठाण्यात भगवान नारायदास पारखे यांच्या फार्यादीवरून गुन्हा दाखल होता. याप्रकरणी संशयीत आरोपी सोबत या प्रकरणात खरेदी व्यवहारातील साक्षिदार मुकेश चौधरी रा. नशिराबाद हा फरार होता. गुप्त माहितीवरू सह्यायक पोलिस निरीक्षक रोहीदास ठोंबरे यांच्या पथकातील किरण …

अधिक वाचा

नागद रोडवरुन मोटारसायकल लंपास

चाळीसगाव – शहरातील नागद रोडवरील अनिलदादा कॉम्पलेक्स समोर लावलेली मोटारसायकल 14 ऑगस्ट रोली लंपास करण्यात आलेली होती. यासंदर्भात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव येथील शेषराव किसन पवार (35) यांनी करगाव येथील विजय राजाराम ठाकरे यांच्याकडुन बजाज सी टी 100 मोटारसायकल क्रमांक एम एच 19 ए …

अधिक वाचा

ट्रक आणि महिंद्रा जीपचा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

हिंगोली : हिंगोली-वाशिम रोड वर ट्रक आणि महिंद्रा जीपच्या झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जीप वाशिमहून हिंगोलीकडे येत होती. अन्नपूर्णा शाळेजवळ या जीपची ट्रकला जोरदार धडक झाली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील दोघा जखमींना अधिक उपचारासाठी नांदेडला …

अधिक वाचा
error: Content is protected !!